remdesivir esakal
पुणे

कोरोनाबाधित कुटुंबाची हतबलता; रेमडेसिव्हिर आणणार कोण?

आजही अनेक रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी करताहेत धावपळ

सकाळ डिजिटल टीम

पुणे : चार जणांचे कुटुंब. त्यातच कुटुंब प्रमुख कोरोनाबाधित झाल्याने रूग्णालयात दाखल आहेत. त्यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज असल्याने रुग्णालयाने घरांच्या ते आणण्यासाठी सांगितले. परंतु, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुली कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्यामुळे होम क्वॉरंटाईन आहे. इंजेक्शन बाजारात नाही, ते आणायलाही कोणी नाही, याची कल्पना रुग्णालयाला देऊनही त्यांनी हात वर केले. आता काय करावे, असा प्रश्‍न त्या महिलेपुढे पडला आहे.

कृष्णा भराड यांची ही परिस्थिती. अशीच परिस्थिती पुणे शहरातील अनेक कुटुंबीयांची आहे. ३० एप्रिलपर्यंत खुल्या बाजारात रेमडेसिव्हिर इंजेक्शनची विक्री करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. रुग्णांच्या नातेवाइकांची पळापळ थांबविण्यासाठी रुग्णालयांनाच या इंजेक्शनचा पुरवठा केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. प्रत्यक्षात मात्र शहरातील परिस्थिती वेगळीच आहे.

आजही अनेक रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी धावपळ करीत आहेत. त्यातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. अशा काळात रुग्णांच्या नातेवाइकांनी बाहेर फिरणे अपेक्षित नाही.मात्र, आजही अनेक रुग्णालयांतून रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शनसाठी सर्रासपणे प्रिस्क्रिप्शन लिहून दिले जात आहे. यावरून जिल्हा प्रशासनाला दोन महिन्यानंतरही या इंजेक्शनचा पुरवठा आणि त्याच्या वितरणाची व्यवस्था लावता आली नसल्याचे यावरून दिसून येते. एकीकडे बाजारात रेमडेसिव्हिरचा तुटवडा असल्याचे चित्र असताना, दुसरीकडे मात्र या इंजेक्शनची काळ्याबाजारात चढ्या दराने विक्री केली जात असल्याचे प्रकारही समोर आले आहे. दहा हजारांपासून ३० हजारांपर्यंत या इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काळाबाजार रोखण्यास अन्न व औषध प्रशासन विभागालाही अपयश आल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

कात्रजमधील प्रकार उघड

रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे औषध विक्रेते, रूग्णालय आणि प्रशासन एकीकडे सांगत आहे. दुसरीकडे मात्र रुग्णालये हे इंजेक्शन काळ्याबाजाराने रुग्णांच्या नातेवाइकांना उपलब्ध करून देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कात्रज परिसरातील एका रुग्णालयाने हे इंजेक्शन दाखल रुग्णांना तब्बल ११ हजार रुपयांना विक्री केल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे महापालिकेने उभारलेल्या जम्बो रूग्णालयाचे काम मिळावे, यासाठी याच रुग्णालयाने एका नेत्यांच्या मध्यस्थीने प्रयत्न केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: साडेतीनशे टक्के शुल्क लावणार होतो; ट्रम्प यांच्याकडून संघर्ष थांबविल्याचा पुनरुच्चार

Viral Video Teacher : शाळेतच मुख्याध्यापकाचा इंग्लिश नजराणा! प्रार्थना सुरू असताना कांबळे सर टल्ली होऊन नाचू लागले अन् व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Latest Marathi News Live Update : मालेगावात आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न

Pandit Deshmukh Murder Case: कोण होते पंडित कमलाकर देशमुख, कशी झाली होती हत्या? सोलापूर हादरवणारी Exclusive माहिती

Hasan Mushrif Kagal : हसन मुश्रीफांच्या मनातलं आलं ओठावर, समरजित घाटगेंसोबत मनोमिलन करणाऱ्या अदृश्य शक्तीचं नाव केलं उघड; मंडलिकांवरही म्हणाले...

SCROLL FOR NEXT