Pune Railway Station Facilitie sakal
पुणे

Pune Railway Station Facilities : प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाचा ‘होऊ द्या खर्च’ ; विमानतळाच्या धर्तीवर पुणे स्थानकावर आता ‘लाउंज’ची सुविधा

विमानतळाच्या धर्तीवर पुणे रेल्वे स्थानकावर आता प्रवाशांसाठी चांगल्या दर्जाचा आलिशान लाउंज बांधण्यात येणार आहे. आरक्षण केंद्राच्या जागेत हा लाउंज बांधण्यात येणार आहे. यात प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळतील. लवकरच याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विमानतळाच्या धर्तीवर पुणे रेल्वे स्थानकावर आता प्रवाशांसाठी चांगल्या दर्जाचा आलिशान लाउंज बांधण्यात येणार आहे. आरक्षण केंद्राच्या जागेत हा लाउंज बांधण्यात येणार आहे. यात प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळतील. लवकरच याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवाशांना बसण्यासाठी फलाट एकवर प्रतिक्षालय आहे. पण ते सामान्य दर्जाचे आहे. तर पार्सल कार्यालयाच्या बाजूलादेखील एक वातानुकूलित प्रतिक्षालय आहे. त्यात कोणत्याही अतिरिक्त सुविधा नाहीत. शिवाय बसण्याची व्यवस्था देखील साधारणच आहे. पुणे स्थानकावर नेहमीच ‘व्हीआयपी’ व्यक्तींचे येणे-जाणे असते. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सर्व सुविधांनी सुसज्ज असे लाउंज बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळतील.

या सुविधा मिळतील

  • आरामदायक सोफा

  • चहा, कॉफी, नाश्त्याचे पदार्थ (याचे दर स्वतंत्र असतील)

  • फ्री वायफाय

  • पुस्तके, मासिक, वृत्तपत्रे

  • वातानुकूलित यंत्रणा

  • स्वच्छ स्वच्छतागृह

आरक्षण खिडक्या होणार कमी

ऑनलाइन तिकीट काढण्याचे प्रमाण खूप वाढल्याने पुण्यासह देशातील रेल्वे स्थानकांवरील आरक्षण केंद्रातील प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे. पुणे स्थानकाच्या आरक्षण केंद्रावरील निम्म्याहून अधिक खिडक्या गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत. तेव्हा रेल्वे प्रशासनाने बंद असलेल्या खिडक्यांच्या व समोरच्या मोठ्या जागेत लाउंज बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उपलब्ध जागेचा चांगला वापर होणार आहे. शिवाय यातून रेल्वेला उत्पन्न देखील मिळणार आहे. या सुविधेसाठी प्रवाशांना तासानुसार पैसे द्यावे लागतील.

प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी पुणे स्थानकावर ‘लाउंज’ सुरू केले जाईल. लवकरच याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल. हे लाउंज विमानतळाच्या धर्तीवर बांधले जाईल.

- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Ahir: ''मी पक्ष सोडलेला नाही...'', शिवसेनेकडून उपसभापतीपदाचा अर्ज भरल्यानंतर सचिन अहिर काय म्हणाले? शिंदेंनी सांगितली तांत्रिक बाजू

IND vs ENG : तो परतला... भारतीय संघाची ताकद वाढली, इंग्लंडची भलतीच कोंडी झाली! पहिल्याच सराव सत्रात नेमकं काय घडलं?

Crime: फ्री मोमोजच्या बहाण्याने तरुणींना जाळ्यात ओढलं; नंतर धार्मिक स्थळी अश्लील व्हिडिओ बनवले अन्... रेहानचे भयंकर कृत्य

Police Officer Transfer: पोलीस खात्यात मोठी उलथापालथ! १० वरिष्ठ अधिकाऱ्यांची नव्या ठिकाणी नियुक्ती; तातडीने रुजू होण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : 'गोकूळ'साठी आघाडीचं आज शक्तिप्रदर्शन

SCROLL FOR NEXT