library FILE IMAGE
पुणे

राज्यातील पहिली सर्वात मोठी ‘सिटी लायब्ररी’ पुण्यात

जयकर ग्रंथालयानंतरचे पुण्यातील सर्वात मोठे ग्रंथालय; ५० हजारांहून अधिक ग्रंथसंपदा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : स्वातंत्र्योत्तर काळात स्थापन झालेल्या तत्कालीन पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयानंतर पुण्याची ग्रंथालय परंपरा पुढे नेण्याचे काम करणारी राज्यातील पहिली ‘सिटी लायब्ररी’ घोले रस्त्यावर साकारत आहे. ५० हजारांहून अधिक ग्रंथसंपदा असणारे हे ग्रंथालय शहरातील मोठ्या सार्वजनिक ग्रंथालयांपैकी एक असेल. स्थानिक नागरिक, अभ्यासक, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आदींसाठी महापालिकेचे हे सुसज्ज ग्रंथालय उपयुक्त ठरणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या घोले रस्त्यावर पुणे महापालिकेचे ‘मुद्रणमहर्षी मामाराव दाते मुद्रणालय’ आणि कोठी आहे. त्याभोवती महापौर निवास, ‘पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन’, ‘राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी’, क्षेत्रीय कार्यालय अशा वास्तू आहेत. या जागेचा पूर्ण क्षमतेने वापर होण्यासाठी एकत्रितपणे विकास करण्याचा प्रस्ताव महापालिकेने गेल्या अर्थसंकल्पादरम्यान मांडला होता. त्यातील मोडकळीस आलेल्या ‘मुद्रणमहर्षी मामाराव दाते मुद्रणालया’चा पुनर्विकास करून तेथील सुमारे ३५ हजार चौरस फूट जागेवर ‘सिटी लायब्ररी’ची उभारणी केली जाणार आहे.

नागरी सेवा परीक्षा, बॅंकिंग परीक्षा, लोकसेवा आयोग व अन्य स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी दरवर्षी हजारो विद्यार्थी पुण्यात येत असतात. या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयात संदर्भसाहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. तळमजला अधिक तीन मजले अशी रचना असलेल्या या इमारतीमध्ये सुरुवातीला एकाच वेळी किमान ४०० विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार आहे. भविष्यात ही संख्या आणखी वाढविण्याची तरतूदही इमारतीच्या आराखड्यात करून ठेवली आहे. येथे एकूण ५० हजार पुस्तके व नियतकालिके उपलब्ध असतील. ४० संगणक असलेली डिजिटल लायब्ररी हे या ‘सिटी लायब्ररी’चे वैशिष्ट्य असणार आहे. या प्रकल्पासाठी १३ कोटी रुपयांची तरतूद केली असून, त्यापैकी ६.७१ कोटी रुपये खर्चाला मान्यता दिली आहे. तसेच, तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या खासदार निधीतून दोन कोटी रुपये देऊ केले आहेत. महापालिकेसाठी उत्पन्नाचा पर्यायी स्रोत म्हणून पहिल्या मजल्यावरील जागा भाडेतत्त्वावर दिली जाणार आहे.

''लेखक आणि प्रकाशक यांच्यासह ग्रंथालयांच्या रूपात पुण्याला उत्तुंग सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. अशा या शहराचे आपले स्वतःचे भव्य ग्रंथालय असावे, या हेतूनेच ‘सिटी लायब्ररी’ विकसित होते आहे. हे ग्रंथालय पुण्याच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरेल.''

- गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Marathi Bhasha Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या एमआयएमने बिहार महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त

SCROLL FOR NEXT