Ashadhi Wari sakal
पुणे

Ashadhi Wari : अश्वांच्या दौडीने वारकरी भारावले ;बेलवाडीत रंगले सोहळ्यातील पहिले गोल रिंगण,अंथुर्णेत मुक्काम

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सोमवारी (ता. ८) बेलवाडीत रंगले. सकाळी पावणे दहाच्या सुमारास देवाच्या आणि स्वाराच्या अश्वांनी पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या. डोळ्यांचे पारणे फेडणारी ही दौड अनुभवत उपस्थित वारकरी, फडकरी, मानकरी आणि भाविक भक्तांनी आनंद लुटला.

राजेंद्रकृष्ण कापसे

अंथुर्णे : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सोमवारी (ता. ८) बेलवाडीत रंगले. सकाळी पावणे दहाच्या सुमारास देवाच्या आणि स्वाराच्या अश्वांनी पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या. डोळ्यांचे पारणे फेडणारी ही दौड अनुभवत उपस्थित वारकरी, फडकरी, मानकरी आणि भाविक भक्तांनी आनंद लुटला.

बेलवाडीतील मैदानाचा मध्य काढून यंदा नवीन चौथरा तयार केला आहे. त्यावर सुंदर शामियाना तयार करून झुंबर लावले होते. रिंगण सुरू असताना वारकऱ्यांना सूचना देण्यासाठी व्यासपीठ होते. मैदान गोल रिंगणासाठी सज्ज होते. सोहळ्यातील अग्रभागी असलेला नगारखाना आणि अश्व सकाळी साडेआठ वाजता पोचहोला.

त्यामागे २७ दिंड्या आणि त्यानंतर पालखी रथ पोचला. दिंडी प्रदक्षिणा करण्यासाठी पावले खेळत वारकरी रिंगणात आले. फटाक्यांची आतषबाजी करून पालखीचे स्वागत झाले. सुनील महाराज मोरे यांनी ध्वनिक्षेपकावरुन सूचना देऊन तयारी केली. देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, सोहळाप्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे उपस्थित होते. नगारखानासोबतच्या युवकांनी मनोरा केला.

पालखी रथातून खांद्यावर घेऊन मध्यभागी आणली. पखवाज व टाळकरी शिंग यांचा ‘ज्ञानोबा- तुकाराम’ जयघोष सुरू होता. सूचनेनुसार मेंढ्यांचे‌ रिंगण, सोहळ्यातील पताकाधारी, हंडा तुळस घेतलेल्या महिला, विणेकरी, देवस्थानचे अध्यक्ष, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य विभाग, पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एक प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर पखवाज वादक आणि टाळकरी यांचे ठेक्यावर संत तुकारामांचे भजन सुरू होते. त्यांचीही प्रदक्षिणा झाली. ग्रामस्थांच्या हस्ते अश्वपूजन झाले. देवाचा अश्व विनायकराव रणेर (रा. पेठ बाबुळगाव) यांचा तर स्वाराचा अश्व अकलूज येथील मोहिते पाटलांचा आहे.

वायूवेगाने प्रदक्षिणा पूर्ण

अश्वांनी चालत प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर ‘पुंडलिक वर दे..’असा जयघोष करीत अश्वाचे रिंगण सुरू झाले. भाविकांनी टाळ्यांच्या गजर केला. दोन्ही अश्वांनी वायूवेगाने चार प्रदक्षिणा पूर्ण केल्या. घोड्यांच्या टापा खालील माती कपाळी लावण्यासाठी वारकरी रिंगणात धावले. काहींनी कागदात बांधून शेतात टाकण्यासाठी नेली.

त्यानंतर, चोपदार नामदेव गिराम यांनी टाळकरी पखवाज वादक यांना उडीच्या कार्यक्रमासाठी बोलवले. ‘ज्ञानोबा तुकाराम’ चार जयघोष झाला. त्यानंतर, ‘उजळलें भाग्य आतां। अवघी चिंता वारली॥...’ हा संतपर अभंग पुंडलिक महाराज मोरे देहूकर यांनी घेतला. रिंगणात वारकऱ्यांचे सांप्रदायिक खेळ सुरू झाले. महिलांनी फुगडी फेर धरून आनंद घेतला. ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन मारुती मंदिरात नेली. दुपारी दोन वाजता पालखी मार्गस्थ झाली. लासुर्णे ते जंक्शन या टप्प्यावर वरुणराजाने मनसोक्त जलाभिषेक केला. संध्याकाळी सोहळा अंथुर्णे येथे मुक्कामी विसावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2025

Suryakumar Yadav : खिलाडूवृत्तीपेक्षा भावना महत्त्वाच्या; हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत, नेमकं काय म्हणाला?

Satara fraud:'बहुलेतील एकाची १३ लाखांची फसवणूक'; बनावट कागदपत्रांद्वारे माेटारीची विक्री, सहा जणांवर गुन्हा

Nagpur Crime: नागपुरात कचरा गाडी चालकाचा खून, जुन्या वादातून घडली घटना...

SCROLL FOR NEXT