Pune Metro sakal
पुणे

Pune Metro : पुणेरी मेट्रोची पहिली ट्रेन पुण्यात दाखल ; पुण्याची गतिमानता वाढण्यास होणार मदत

हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन ३ या प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीची गती वाढविण्यासाठी आता ‘पुणेरी मेट्रो’ची पहिली ट्रेन पुण्यात दाखल झाली आहे. ‘

सकाळ वृत्तसेवा

पुणे : हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन ३ या प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीची गती वाढविण्यासाठी आता ‘पुणेरी मेट्रो’ची पहिली ट्रेन पुण्यात दाखल झाली आहे. ‘

अलस्टॉम’ या प्रसिद्ध कंपनीने आपल्या श्रीसिटी (आंध्र प्रदेश) येथील कारखान्यात तयार केलेली तीन डब्यांची मेट्रो ट्रेन पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे. पहिली पुणेरी मेट्रो ट्रेन रविवारी (ता. २) पुणे मेट्रो लाईन ३ च्या माण येथील डेपोत दाखल होणार असल्याची, माहिती पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडतर्फे देण्यात आली.

या कामाचे कंत्राट टाटा समूहाला देण्यात आले आहे. टाटा समूहाच्या वतीने ‘अलस्टॉम’ कंपनीला पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पासाठी प्रत्येकी तीन डबे असलेल्या एकूण २२ ट्रेनचा संच उपलब्ध करून देण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ताशी ८५ किलोमीटर इतक्या अधिकतम वेगाने धावू शकणाऱ्या या प्रत्येक ट्रेनमधून एका फेरीत तब्बल एक हजार प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.

पुणे आयटी सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर म्हणाले, ‘‘माण - हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर उपयोगात आणल्या जाणाऱ्या सर्व ट्रेन्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. या मार्गावरील सर्व ट्रेन थर्ड रेल प्रणालीचे अवलंब करतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

SCROLL FOR NEXT