बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन sakal
पुणे

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन

ताडीवाला रोड येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

मुंढवा : ताडीवाला रोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अनु-जाती विभागच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवांच्या पुतळ्यास प्रियांका रणपिसे- दरवाडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतमराव भोसले यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अनु-जाती विभागाचे उपाध्यक्ष सुजीत यादव व प्रभाग क्रं. २० चे कॉंग्रेस व युवक कॉंग्रेस सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले. समाजतील अंध, अपंग, निराधार, विधवा, जेष्ठ नागरिकांना, यांना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत मंजूर झालेल्या पेन्शन मंजुरी पत्र व पुस्तिकांचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच कोविड मध्ये मृत झालेल्या नागरिकांना शासनातर्फे जी ५०,००० रु आर्थिक मदत जाहीर केली आहे, त्याचे ऑनलाईन फ्रॉम मोफत भरून देण्याच्या कामाचा ही प्रारंभ करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश साळवे, राजेंद्र रणपिसे, अभिजीत दरवाडे, सचिन सुडगे, अभिमन्यू सूर्यवंशी, सतीश बनसोडे विक्रम कांबळे, महेश गायकवाड, आदींनीही महामानवास अभिवादन केले. सूत्रसंचालन संदीप कांबळे व आभार दयानंद तानवडे यांनी केले.

ताडीवाला रोड येथील नगरसेवक प्रदिप गायकवाड व प्रा. मयुर गायकवाड यांनी स्टेशनील महामानवाल पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. श्याम गायकवाड यांनीही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेवून महामानवाला अभिवादन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Wildlife: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! अंबा नदीत आढळला परदेशी व दुर्मिळ 'अल्बिनो एलीगेटर गार' मासा; रायगडमध्ये दुर्मिळ परदेशी माशाचा शोध

सई ताम्हणकरच्या 'बोल बोल राणी' मधलं 'सुपरनोव्हा' गाणं प्रदर्शित; पण सुपरनोव्हा म्हणजे काय?

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! पत्नीशी वादानंतर पतीने घर पेटवले; तीन पाळीव मांजरांचा मृत्यू

Kinwat Forest Department: किनवट वन विभागाला हायकोर्टाचा झटका; RTI माहिती न दिल्याप्रकरणी अधिकाऱ्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT