पुणे

पुण्यात वाढला पुन्हा उन्हाचा चटका

CD

पुणे, ता. १५ : शहर आणि परिसरात पूर्वमोसमी पावसाचा प्रभाव आता ओसरल्याने पुन्हा उन्हाचा चटका वाढू लागला आहे. शहरात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने कमाल तापमानाचा पारा वाढत ३७.५ अंश सेल्सिअस नोंदला. पुढील तीन दिवसांमध्ये आकाश निरभ्र होणार असल्याने कमाल तापमानाचा पारा परत चाळीशीपर्यंत उसळी मारेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.

शहरात शनिवारी (ता. ११) आणि रविवारी (ता. १२) धुवांधार पाऊस झाला. वळिवाच्या या पावसामुळे शहरात चाळीशीपार गेलेला कमाल तापमानाचा पारा ३१ अंश सेल्सिअसपर्यंत कमी आला. उन्हाच्या चटक्याने होरपळणाऱ्या पुणेकरांना गेले दोन-तीन दिवस थोडा दिलासा मिळत होता, पण आज पुन्हा शहरात उन्हाचा चटका वाढला. कमाल तापमानाचा पारा सरासरी इतका परत नोंदला गेला. शिवाजीनगर येथे कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले, तर, लोहगाव येथे ३६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

शहर आणि परिसरात येत्या गुरुवारी (ता. १६) दुपारपर्यंत आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून, त्यानंतर ढगाळ होईल. मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या स्वरुपातील सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली. त्यानंतर पुढील दोन दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असल्याने उन्हाचा चटका वाढेल. पुण्यात येत्या शुक्रवारी (ता. १७) आणि शनिवारी (ता. १८) ३९ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान वाढेल, तर रविवारी (ता. १९) ४० अंश सेल्सिअसपर्यंत पारा उसळी मारेल.
.......
असे वाढले ऊन
तारीख ............... कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
११ .......................... ३७.८
१२ .......................... ३१.४
१३ .......................... ३६.३
१४ .......................... ३७.१
१५ .......................... ३७.५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

आजचे राशिभविष्य - 25 मार्च 2026

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar:‘आदर्श’मध्ये अजूनही ३३८ कोटी अडकलेले ; साडेतीन वर्षांत दहा टक्केही कर्ज वसुली नाही

SCROLL FOR NEXT