lpg gas
lpg gas sakal
पुणे

राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे गणित कोलमडले

युनूस तांबोळी

रांजणगाव गणपती : राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. खाद्य तेलापासून ते सर्वसामान्याच्या खाद्यातील डाळी पर्यंत महागाई जाणवू लागली आहे. अशात गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या बारा महिण्यात 290 ते 300 रूपये दरवाढ झाली आहे. सध्या घरगुती गॅस सिलिंडर 887 रूपये 50 पैसे झाला आहे. ग्रामीण भागातील दलाल सिलिंडर वाहतूक म्हणून गॅस मागे 30 रूपये आगाऊ घेत आहेत.

अनुदान बंद असल्याने हा संपुर्ण बोजा ग्राहकांवर पडत आहे. ग्रामीण भागात सिलिंडर पोहचसहित 930 रूपये गॅस मिळत असल्याने या गॅस महागाईच्या भडक्याने महिलांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पेट्रोलचे दर 100 रूपये वरून आता 108 रूपयांपर्यंत पोहचले आहे. डिझेल कोणत्याही क्षणी 100 रूपयांवर जाईल. असे चित्र आहे. काम नाही, पगार कमी, व्यापारात घट, ग्राहक नसल्याने व्यवसायीक अडचणीत आले.

घर चालवायाला पैसा नसताना आर्थीक संकट चारी बाजूंनी मध्यमवर्गीय व गरीबांना भरडून टाकत आहे. त्यांच्यासाठी गॅस सिलिंडरची वर्षात झालेली 290 रूपयांची दरवाढ डोंगराएवढी आहे. शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परीसरात जवळपास 20 ते 25 हजार घरगूती गॅस वापरणाऱ्यांची संख्या आहे. व्यवसायीक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होऊन 19 किलोचा सिलिंडर आता 1697 रूपयांना मिळतोय.

केवळ अकरा महिण्यात एवढी वाढ आश्चर्यकारक असल्याची चर्चा व्यवसायीक करू लागले आहेत. सध्या 14.2 किलोचा घरगूती गॅस 887. 50 रूपये व आगाऊ 30 रूपये पोहच असे 917.50 रूपये दराने गॅस मिळत आहे. काही दुकानात 925 ते 930 रूपयांना घरगुती गॅस मिळत असल्याचे बोलले जाते.

गेल्या वर्षात झालेली घरगूती गॅसची दरवाढ

1 सप्टेंबर 2020----- 597.00

1 आक्टोंबर 2020---- 597. 00

1 नोव्हेबंर 2020 --- 597. 00

1 डिसेंबर 2020 --- 597.50

1 जानेवार 2021 --- 697.00

1 फेब्रुवारी 2021-- 697.00

4 फेंब्रुवारी 2021-- 722.00

1 मार्च 2021 -- 822.00

1 एप्रिल2021 -- 812.00

1 मे2021 --- 812.00

1 जून 2021 -- 812.00

1 जुलै2021-- 837.50

1 ऑगस्ट 2021--- 837.50

17 ऑगस्ट 2021--- 862.50

1 सप्टेंबर 2021--- 887.50

गॅस ही जीवनावश्यक वस्तू असूनही असी सतत होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गॅस दरवाढ नियंत्रणासाठी सरकार कडून ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. - गायत्री चिखले माजी सरपंच पिंपरी दुमाला ( ता. शिरूर )

गॅस दरवाढ हे प्रत्येक घरावरील संकट आहे. छोटे उत्पन्न असणाऱ्यांसाठी महिन्यासाठी तिनशे रूपये जास्त मोजावे लागणे कसरतीचे झाले आहे. गॅस दर नियंत्रणात आणली पाहिजे. जीवनावश्यक वस्तू असूनही अशी दरवाढ सतत होणे त्रासदायक आहे. - नलीनी खर्डे माजी सरपंच कान्हूर मेसाई ( ता. शिरूर )

गॅस दरवाढीने व्यवसायीकांच्या अडचणी वाढल्या आहेत. हॅाटेलात अगोदरच ग्राहक कमी आहेत. त्यात झालेली ही दरवाढ परवडणे शक्य नाही. - गोरक्ष भुजबळ हॅाटेल व्यवसायीक

गॅस वाढीचा परिणाम...

पाच जणांच्या कुटूंबाचा खर्च महिण्य़ाला 300 ते 325 रूपयांनी वाढला

ग्रामीण भागाकडे पुन्हा चुलीकडे मोर्चा

शहरात गॅस गिझर ऐवजी इलेक्टिक गिझरचा पर्याय येतो समोर

लहान लहान व्यवसायीक अडचणीत

हॅाटेल व्यवसायिक भाव वाढीच्या मनस्थीतीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT