Pune News esakal
पुणे

Pune News: पुणेकरांचा प्रवास होणार अधिक सुखकर; दोन नव्या पुलांच्या कामास महापालिकेची मान्यता

रुपेश नामदास

पुणे, ता. ३ ः शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेने सनसिटी-कर्वेनगर हा मुठा नदीवर नवीन पूल बांधणे आणि कोरेगाव पार्क येथील रेल्वे मार्गावरील साधू वासवानी पूल पाडून नवा पूल बांधण्याच्या कामास मान्यता दिली आहे. सनसिटी पुलासाठी ३७ कोटी चार लाख, तर साधू वासवानी पुलासाठी ५३ कोटी ५५ लाख रुपये खर्च येणार आहे.

सिंहगड रस्ता आणि कर्वेनगर, कोथरूड हा भाग वाहतुकीच्यादृष्टीने आणखी जवळ यावा यासाठी महापालिकेने सनसिटी ते कर्वेनगर यादरम्यान पूल प्रस्तावित केला आहे. यासाठी पूर्वी निविदा प्रक्रिया राबवून काम प्रारंभ करण्याचे आदेश दिले होते.

मात्र, संबंधित ठेकेदार कंपनी ही दिवाळखोरीत निघाल्याने काम सुरूच होऊ शकले नसल्याने ती निविदा रद्द केली. त्याचे भूमिपूजनही लांबणीवर पडले होते. मात्र, प्रशासनाने पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली.

त्यामध्ये मे. विजय सुदाम पटेल या ठेकेदार कंपनीने १२ टक्के कमी दराने निविदा भरली. ही सर्वांत कमी खर्चाची निविदा असल्याने त्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला. त्यास प्रशासक विक्रम कुमार यांनी बुधवारी मान्यता दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाने ४९ वर्षांपूर्वी लष्कराचा आणि कोरेगाव पार्क हा भाग जोडण्यासाठी रेल्वे रुळावरून (आरओबी) पूल बांधला होता. त्यामुळे नगर रस्ता आणि हडपसर भागात जाण्यासाठी हा पूल महत्त्वाचा आहे. हा पूल जुना झाल्याने व वाहतूक वाढल्याने तो पाडून नवा पूल बांधणे आवश्‍यक होते. त्यादृष्टीने महापालिकेने सल्लागार नेमून त्याची चाचपणी केली.

त्यानुसार नवा पूल बांधणे आवश्‍यक असल्याचे समोर आले. त्यामुळे महापालिकेने निविदा प्रक्रिया मागविली होती. एस. एम. सी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीने सर्वांत कमी रकमेची ५८ लाख ११ हजार ३३६ रुपयांची निविदा भरली होती. त्यास मान्यता दिली.

हे काम सुरू झाल्यानंतर या पुलावरील वाहतूक पुणे स्टेशन परिसरातील रस्त्यावरून वळवली जाणार आहे. पावसाळा वगळून हे काम पूर्ण होण्यासाठी २४ महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत या भागातील वाहतूक इतर मार्गांनी वळवली लागणार आहे.

दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडण्यासाठी बोपोडी आणि औंध यादरम्यान मुळा नदीवर पूल उभारला जाणार आहे. या पुलाचे काम पिंपरी-चिंचवड महापालिका करणार असून, त्याचा ५० टक्के खर्च पुणे महापालिका देणार आहे.

७६० मीटर लांब आणि १८.६० मीटर रुंद या पुलासाठी एकूण ३६.२५ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी पुणे महापालिकेचा १८.१३ कोटी रुपयांचा हिस्सा दिला जाणार आहे. तूर्त पिंपरी-महापालिकेने १० कोटींची मागणी केल्याने तो निधी देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT