Pune Election
Pune Election Esakal
पुणे

Pune Election : चिंचवडमध्ये भाजपचं ठरलं? शंकर जगताप-फडणवीस यांच्या भेटीने चर्चांना उधाण

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात पुण्याच्या पोटनिवडणुकीचा विषय चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही जागेसाठी इतर पक्ष आपले उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहेत. अशातच भाजपकडून मुक्ता टिळक यांच्या परिवारातील त्याचबरोबर लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीच्या आणि भावाच्या उमेदवारीची चर्चा सुरू असतानाच चंद्रकांत पाटील यांनी दोन वेळा पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर काल देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप यांच्या घरी भेट दिली या भेटील निवडणुकीबद्दल चर्चा झाल्याचे तर्क वितर्क लावले जात होते.

यासंबधी लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी माहिती दिली आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर शोक सभा झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना घरी यायचं होतं. घरी येऊन त्यांना कुटुंबियांची भेट घ्यायची होती. त्यांनी त्यासंदर्भात माहितीदेखील दिली होती. त्यानुसार त्यांनी आमची सर्वांची भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

पोटनिवडणुकी संदर्भात यावेळी कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांनी लक्ष्मण जगताप यांच्या कामाचं कौतुक केलं. बंद दारामागे काहीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं शंकर जगताप यांनी स्पष्ट केलं.

भाजपला कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करायची आहे. मात्र अश्विनी जगतापांना उमेदवारी दिली तरच बिनविरोध शक्य होणार आहे. पण जर शंकर जगतापांना तिकीट दिल्यास विरोधकांनी निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. त्यामुळे अश्विनी जगतापांना उमेदवारी देण्यासंदर्भात आणि शंकर जगतापांची समजूत काढण्यासाठी फडणवीस आले होते. अशा चर्चा रंगल्या होत्या.

अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिल्यानंतर जगताप कुटुंबीयात कोणताही वाद होऊ नये म्हणून फडवीसांनी ही खबरदारी घेतल्याचंही बोललं जातं आहे. पण अर्धा तासांच्या बैठकीनंतर फडणवीस माध्यमांशी न बोलताच निघाले. त्यानंतर लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी ही भेट राजकीय नसल्याचे सांगत, या भेटीत उमेदवारी बाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Video: काय होतास तू काय झालास तू ? इम्रान खान की आजोबा, पाकच्या माजी पंतप्रधानांचा सोशल मिडीयावरील व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : भाजप महिला मोर्चाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने

Ex-Wipro CEO: राजीनाम्यानंतर, विप्रोच्या सीईओने कंपनीचे शेअर्स विकून कमावले 70 कोटी; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

शाळेच्या आवारात विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने संतप्त जमावाने पेटवली शाळा

Biotin Rich Food : केस, त्वचा, मधुमेह आणि बरंच काही…; बायोटीनयुक्त पदार्थ खा अन् या आजारांची कायमची सुट्टी करा!

SCROLL FOR NEXT