mini bus burning sakal
पुणे

कात्रज बोगद्याजवळ मिनी बसनं घेतला पेट; सर्व प्रवाशी सुरक्षित

दुर्घटनेत संपूर्ण गाडी जळून खाक

सकाळ वृत्तसेवा

खेड-शिवापूर : कात्रज नवीन बोगद्याजवळ एका टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसने सोमवारी सायंकाळी अचानक पेट घेतला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच बसला बाजूला घेऊन सर्व प्रवाशांना खाली उतरविल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या दुर्घटनेत संपूर्ण गाडी जळून खाक झाली.

याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. पुण्याहून कार्यक्रम आटोपून एक कुटुंब टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसने कोल्हापूरला निघाले होते. यावेळी कात्रज नवीन बोगद्यात आल्यावर गाडीच्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाले. बोगद्याच्या बाहेर शिंदेवाडी गावच्या हद्दीत आल्यावर गाडीच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाला दिसले. त्याबरोबर प्रसंगावधान राखून ताबडतोब चालक सिद्धार्थ चौगुले याने गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली आणि गाडीतील सर्व प्रवाशांना खाली उतरवले. अन त्याबरोबर गाडीने पेट घेतला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे या बसमधील दहा जणांचे प्राण वाचले.

या घटनेची माहिती मिळताच शिंदेवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अग्निशामक दलाला कळवले. तोपर्यत नवीन बोगद्यातून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली. सुमारे पंधरा मिनिटांत अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. सुमारे पंधरा मिनिटात त्यांनी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला लागलेली आग आटोक्यात आणली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT