corona update sakal
पुणे

पुण्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या दीड हजारांच्या आत

दिवसात १०९ नवे रुग्ण : १६७ जण कोरोनामुक्त

गजेंद्र बडे - सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी (ता.२७) दीड हजाराच्या आत आली आहे. आज अखेर शहरात १ हजार ४१३ सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत. एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी ६९१ रुग्ण शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्यांपैकी १८२ रुग्ण गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत.

याशिवाय ७२२ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. पुण्यात दिवसभरात १०९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट १६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. अन्य दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात दिवसभरात ४१० नवे रुग्ण आढळून आले असून, ८१५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आज सात जणांचा मृत्यू झाला आहे.

एकूण मृत्युमध्ये पुणे व पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी दोन आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरातील नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील १०९ रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमधील ७३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १८८, नगरपालिका हद्दीतील ३६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ४ रुग्णांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना स्थिती दृष्टीक्षेपात

  • - आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या --- ११ लाख ३६ हजार ७७५

  • - कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या --- ११ लाख ११ हजार ८८८

  • - कोरोनाने झालेले एकूण मृत्यू --- १८ हजार ९११

  • - सध्याचे एकूण सक्रिय कोरोना रुग्ण --- ६ हजार ११३

  • - यापैकी उपचार घेत असलेले रुग्ण --- २ हजार ६३२

  • - गृह विलगीकरणात असलेले --- ३ हजार ४८१

  • - दिवसभरात घेतलेल्या कोरोना चाचण्या --- १९ हजार १५७

  • - आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्या --- ७६ लाख ४९ हजार ९४२

  • - आतापर्यंत झालेले एकूण कोरोना लसीकरण (दोन्ही डोस मिळून) --- सुमारे १ कोटी पाच लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : मयूर रथातून दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक; रंगीबेरंगी फुलांनी सजला रथ; सकाळी ८ वाजता मुख्य मंदिरातून मिरवणुकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT