पुणे

दिलासा! पुणे जिल्ह्यात नव्या रुग्णांची संख्या हजारच्या आत

शरयू काकडे

पुणे : पुण्यात तब्बल 2 महिन्याच्या लॉकडाऊननंतर कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांची आकडेवारी हजारच्या आत आली आहे. दरम्यान, शहरात अनलॉक केल्यामुळे नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोकाही पुन्हा वाढू शकतो त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्या निंयत्रणात आली असली तरी पुणेकरांनो काळजी घ्याच.

पुणे जिल्ह्यात सोमवारी(ता. 7) एकूण 837 नवे कोरोना रुग्ण आढळले असून त्यापैकी पुणे शहरात 177, पिंपरी चिंचवड 206, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र 384, नगरपालिका क्षेत्र 68, कॅंटोन्मेंट बोर्ड 02 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1719 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 37 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 17720 सक्रिय रुग्ण आह. दरम्यान गेल्या 24 तासात 15990 जणांची कोरोना चाचणी झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील आजपर्यंतचा कोरोना बाधितांची संख्या 10,24,277 वर पोहोचली आहे तर कोरोनामुक्तांची संख्या 9,90,018 वर पोहचली आहे. जिल्ह्यात आतापर्यत 51,631930 जणांची कोरोना चाचणी झाली आहे.

दिवसभरात ५१४ रुग्णांना डिस्चार्ज !

शहरातील ५१४ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६० हजार ०७८ झाली आहे.

दिवसभरात नवे १७७ कोरोनाबाधित!

पुणे शहरात आज नव्याने १७७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७२ हजार ४३१ इतकी झाली आहे.

पुणे कोरोना अपडेट : सोमवार,०७ जून,२०२१

◆ उपचार सुरु : ३, ९४३

◆ नवे रुग्ण : १७७ (४,७२,४३१)

◆ डिस्चार्ज : ५१४ (४,६०,०७८)

◆ चाचण्या : ४,७७५ (२५,४३,७७३)

◆ मृत्यू : १५ (८,४१०)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT