पुणे

पुणे जिल्ह्यात ३८ टक्के नागरिकांचे लसीकरण

१९ लाख ५८ हजार नागरिकांना पहिला डोस

अनिल सावळे -@AnilSawale

पुणे : शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १९ लाख ५८ हजार (३८ टक्के) नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी ५ लाख ६६ हजार ८३६ (११ टक्के) नागरिकांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित नागरिकांची संख्या तुलनेत अधिक आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील लोकसंख्या एक कोटी १७ लाख आहे. त्यापैकी लसीकरणासाठी अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या ५१ लाख ७५ हजार इतकी आहे. पुण्यात लसीचा तुटवडा निर्माण होण्यापूर्वी लसीकरणाने चांगला वेग घेतला होता. राज्यात सर्वाधिक कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सातारा जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात ३८ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला. तर, ११ टक्के नागरिकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.

ज्येष्ठांचे लसीकरण ८० टक्क्यांवर

जिल्ह्यातील ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांचे ८० टक्के लसीकरण झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांची संख्या दहा लाखांच्या जवळपास आहे. त्यापैकी ७ लाख ८० हजार ५१८ ज्येष्ठांना लसीचा पहिला डोस मिळाला. तसेच, २ लाख ६७ हजार २८२ ज्येष्ठांना दुसरा डोस देण्यात आला. तर, लशीच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील केवळ ५० हजार नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे.

''प्रत्यक्ष लसीकरण केंद्रांवर जाऊन आढावा घेतला. सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न केले. ज्या केंद्रांवर सुरवातीच्या कालावधीत लसीकरण जास्त झाले, त्याठिकाणी पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा झाला. जिल्ह्यात एका दिवसात सर्वाधिक ८५ हजारपर्यंत लसीकरणाचा टप्पा गाठला आहे.''

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

  • लसीकरण केंद्रे ६९९

  • अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या ५१ लाख ७४ हजार ७७१

  • पहिला डोस १९ लाख ५८ हजार ६५ (३८ टक्के)

  • दुसरा डोस ५ लाख ६६ हजार ८३६ (११ टक्के)

वयोगट पहिला डोस दुसरा डोस

  • ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक ७ लाख ८० हजार ५१८ (८० टक्के) २ लाख ६७ हजार २८२ (२७ टक्के)

  • ४५ ते ५९ वर्षे ८ लाख १० हजार ६०९ (४७ टक्के) १ लाख ३९ हजार २२५ (८ टक्के)

  • १८ ते ४४ वर्षे ५० हजार ८३ (२ टक्के) शून्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश पहिली यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT