पुणे

'तोटा झाला तरी मी खचलेलो नाहीये'; कोरोना काळातही पुण्यातील उद्योजकाचा आशावाद

महेश जगताप

पुणे : सहा-सात वर्षांपूर्वी मी लातूरहून पुणे शहरात व्यवसाय करण्यासाठी स्थायिक झालो. या शहरात मी कापड व्यवसायाची दोन शोरूम उघडली. एक लक्ष्मी रास्ता आणि दुसरं ढोले पाटील रस्ता. दोनीही दुकाने छान चालली होती. पण गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थोडसं आम्हाला या व्यवसायात मागे खेचले. लक्ष्मी रस्त्यावर असणाऱ्या कापडाच्या दुकानाला दोन लाख रुपये भाडे होते. सुरवातीचे आठ महिने तोटा सहन केला पण गेल्या महिन्यात राज्यभरातील एकूण सात कपड्यांच्या शोरूम पैकी चार शोरूम बंद करावे लागले. त्यामध्ये लक्ष्मी रस्त्यावर असणार लिनन होग हे शोरूमही बंद कराव लागलं. पण मी बिलकुल खचलेलो नाही. ही कठीण वेळ निघून जाणार आहे. पुन्हा नव्या दमाने नवीन कपड्यांची शोरूम सुरू करणार आहे. कोरोनाच्या निराशाजनक वातावरणात असा आशावादी सूर शोरूमचे मालक संजय रादंड यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केला .

एक वर्षापासून कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. याचा फटका अनेक उद्योग व्यवसायास बसला. तसाच कापड व्यवसायास देखील मोठ्या प्रमाणात खिळ बसली. गेल्या वर्षभरात देशात सतत लॉकडाऊन आणि रोगराईने त्रस्त झालेले नागरिक यामुळे साहजिकच कापड व्यवसायाच्या अर्थकरणास फटका बसला. गेल्यावर्षी आणि यावर्षीची लग्नसराई कोरोनात गेली असल्याने त्याचा फटका कापड व्यवसायास बसला. पण जरी चार कापडांची शोरूम रादंड यांना बंद करावी लागली असली तरी ते खचून गेले नाहीत. हे शोरूम मीच उभे केले होते आणि हा कठीण काळ गेल्यानंतरही मीच उभी करणार आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जायचं कारण नाही. कठीण वेळ येते आणि जाते त्यामुळे आलेल्या संकटासमोर खचून न जाता पुन्हा एकदा आपल्याला नव्या जोमाने उभे राहावे लागेल असे मत मांडले ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT