pune sakal
पुणे

Pune : आंदोलनकर्त्यांकडून तळेगाव-चाकण महामार्ग रोखण्याचा प्रयत्न

अतिक्रमणे हटवून,रस्ता दुरुस्तीचे कृती समितीला आश्वासन

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव स्टेशन : तळेगाव चाकण महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे वाढते अपघात आणि तळेगाव, वडगाव वाहतूक नियंत्रण शाखेकडून होत असलेल्या अवजड वाहन प्रवेशबंदीच्या पायमल्ली विरोधात तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीच्या वतीने रविवारी आयोजित ठिय्या आंदोलनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या अतिक्रमणे हटवून,३१ डिसेंबरकृती या रस्त्याची देखभाल दुरुस्ती पुर्ण करणार असल्याचे लेखी आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देण्यात आले.

मराठा क्रांती चौकात सकाळी १० वाजल्यापासून कृती समितीचे सदस्य आणि तळेगाव चाकण परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने जमा झाले होते.मराठा क्रांती स्मारकास पुष्पहार अर्पण करून आणि या महामार्गावर अपघातात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली वाहून ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली.कृती समितीच्या सदस्यांसह त्रस्त नागरिकांनी प्रशासना विरोधात तीव्र भावना याप्रसंगी व्यक्त केल्या.

तळेगाव-चाकण महामार्गावरील वाहतूक नियमानाबाबत आणि अवजड वाहन प्रवेश बंदी बाबत तळेगाव दाभाडे वाहतूक विभाग आणि वडगाव मावळ वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या अवजड वाहन प्रवेशबंदी आदेशाच्या पायमल्ली बाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला.राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी परखड शब्दांत जाब विचारला.कृती समितीचे अध्यक्ष

नितीन गाडे,प्रमोद देशक,माजी नगरसेवक

अरुण माने,दिलीप डोळस ,संस्कार चव्हाण,प्रमोद दाभाडे,उपेंद्र खोल्लम,संदीप गोंदेगावे,जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे आदींची भाषणे झाली.माजी नगरसेवक निखील भगत,आरपीआयचे सुनिल पवार,कल्पेश भगत,मिलिंद अच्युत,अँड.गणेश जगताप, अँड.देविदास टिळे, निवृत्ती फलके,बाळकृष्ण घंगाळे,शेखर मु-हे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सामील झाले होते.

तळेगाव आणि वडगाव मावळ वाहतूक नियंत्रण शाखेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.तसेच,अवजड वाहतूक वडगाव येथून तळेगाव-चाकण एमआयडीसी मार्गे वळवावी अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली.

या आंदोलनानंतर आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी तळेगाव-चाकण महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.मात्र, पोलीस प्रशासनाने शिष्टाई करत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे तांत्रिक व्यवस्थापक अनिल गोराड यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.

मराठा क्रांती चौकाला पोलीस छावणीचे स्वरूप

तळेगाव-चाकण रस्त्या संदर्भात कृती समितीच्या आंदोलनातील नागरिकांचा वाढता जनक्षोभ पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.परिमंडळ 2-चे पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे,सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट,वाहतूक विभागाचे

सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने,वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवदवाड, पोलीस निरीक्षक नितीन लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शीघ्र कृती दलाच्या तुकडीसह जवळपास दिडशे पोलिसांचा मोठा बंदोबस्त सकाळपासूनच आंदोलनास्थळी ठेवण्यात आला होता. त्यामुळे मराठा क्रांती चौकाला दुपारपर्यंत पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.

नोव्हेंबर अखेरपर्यंत तळेगाव-चाकण महामार्गावरील अतिक्रमणे हटवणार

कृती समितीच्या ठिय्या आंदोलनास सामोरे जाऊन निवेदन स्वीकारल्यानंतर येत्या महीना अखेर पर्यंत तळेगाव-चाकण महामार्गावरील अतिक्रमणे हटवणार असल्याचे लेखी आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाचे तांत्रिक व्यवस्थापक अनिल गोराड यांनी आंदोलकांना दिले.राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तांत्रिक सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरु असून,अस्तित्वातील रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल. सुरक्षाविषयक उपाययोजना तातडीने करण्यात येणार आहेत असे गोराड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT