Akashvani Pune Centre  esakal
पुणे

Akashvani Pune Centre: प्रसार भारतीचा मोठा निर्णय! आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद होणार

सकाळ डिजिटल टीम

पुणे: आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला आहे. या संबंधीचा लेखी आदेश पाठविला असून सोमवारपासून (ता. १९) पुणे वृत्त विभागामार्फत प्रसारित होणारे आकाशवाणीवरील प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर वृत्त विभागाकडे सोपविण्यात आले आहे.

आकाशवाणीवरील पुणे प्रादेशिक वृत्त विभागाकडून सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी होणाऱ्या तसेच एफएम वाहिनीवरील सकाळी ८, १०.५८ आणि ११.५८ तसेच सायंकाळी ६ च्याही बातम्या आता बंद होणार आहेत.

तसेच, सकाळी ८.३० वाजताच्या राष्ट्रीय बातम्याही बंद होणार आहेत. या बातम्या आता छत्रपती संभाजीनगर केंद्राहून दिल्या जाण्याची शक्यता आहे. परंतु, पुण्यातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद होणार असल्याने बातम्या पोचणार कशा, याची अनिश्चितता आहे.

देशात आकाशवाणीच्या पुणे केंद्राला सर्वाधिक श्रोते आहेत. सुमारे २४ लाख श्रोते नियमितपणे कार्यक्रम ऐकतात. पुण्यातील केंद्राची स्थापना १९५३ मध्ये झाली असून येथून गेल्या ४० वर्षांपासून बातम्या प्रसारित होत होत्या.

प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे प्रसारित केली जाणारी विविध भारतीवरील ठळक बातमीपत्रे, पुणे वृत्तांत हे विशेष बातमीपत्र आणि वृत्ताधारित कार्यक्रमही आता बंद होणार आहेत. प्रसार भारतीने या विभागांचे प्रमुख म्हणून काम करण्यासाठी भारतीय माहिती सेवेतील पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध नसल्याने पुणे वृत्त विभागाची बातमीपत्रे छत्रपती संभाजीनगर केंद्राकडे सोपविल्याचे आदेशात म्हटले आहे.

सध्या हा विभाग एक भारतीय माहिती सेवेचा अधिकारी (प्रभारी), एक वृत्त निवेदक आणि एक हंगामी वृत्त संपादक याशिवाय हंगामी वार्ताहर इतक्याच मनुष्यबळावर कार्यक्षमपणे सुरू आहे.

याबाबत आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे संचालक इंद्रजित बागल म्हणाले, ‘‘प्रसार भारतीने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT