Amar Mulchandani Sakal
पुणे

Seva Vikas Bank : अमर मूलचंदानी यांना ईडीकडून अटक, सात जुलैपर्यंत कोठडी

पिंपरी येथील सेवा विकास सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अमर साधुराम मूलचंदानी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पिंपरी येथील सेवा विकास सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अमर साधुराम मूलचंदानी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने मूलचंदानी यांना शुक्रवारपर्यंत (ता.७) ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याविरुद्ध ईडीने २८ जानेवारी रोजी कारवाई केली होती. मूलचंदानी यांच्यासह इतर संचालकांनी ४२९ कोटी रुपयांची बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी मूलचंदानी यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर ईडीने छापे टाकले होते.

तपासात असहकार्य आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत मूलचंदानी यांच्यासह कुटुंबीयांविरुद्ध ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीने मूलचंदानी, रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अऱ्हाना, सागर सूर्यवंशी, खेमचंद भोजवानी आणि त्यांच्या कुटुंबीयांची १२२ कोटींची मालमत्ता जप्त केली होती.

मूलचंदानी आणि संचालकांनी मर्जीतील कर्जदारांना बेकायदेशीरपणे कर्ज मंजूर केले. कर्जदारांची पत न तपासता पुरेशा तारण मालमत्तेशिवाय आणि कमिशन घेऊन कर्ज मंजूर केले. त्यामुळे बँक दिवाळखोरीत निघाली असून, अनेक ठेवीदारांचे नुकसान झाले. रोझरी स्कूलचे विनय अऱ्हाना, सागर सूर्यवंशी, खेमचंद भोजवानी यांनी सेवा विकास बँकेकडून कर्ज घेतले होते.

मूलचंदानी यांनी केलेल्या गैरव्यवहारात अऱ्हाना, सूर्यवंशी, भोजवानी यांचा सहभाग असल्याचे ईडीच्या तपासात समोर आल्यानंतर मूलचंदानी यांच्याविरुद्ध कारवाई केली होती. ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात मूलचंदानी यांना अटक करण्यात आली. ईडीच्या पथकाने त्यांना मुंबईतील विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

SCROLL FOR NEXT