crime sakal media
पुणे

पुणे : कोल्हेवाडी गोळीबार प्रकरणाचे धागेदोरे थेट शेगावात

निलेश बोरुडे

किरकटवाडी : एकतर्फी प्रेमातून कोल्हेवाडी, खडकवासला (ता. हवेली) येथील दोघांवर बुधवार (ता. 26 मे) रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी मुख्य आरोपी अक्षय उर्फ रावण चंद्रकांत उभे (वय 27, सध्या रा. कोल्हेवाडी, खडकवासला, मुळ रा. श्रीरामनगर, शेगाव, जि. बुलढाणा) यास त्याच दिवशी हवेली पोलीसांनी अटक केली होती.

एकतर्फी प्रेमास विरोध करणाऱ्या महिलेच्या नातेवाईकांवर सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळ चालत्या कारमध्ये अक्षय उभे याने गावठी पिस्तुलातून गोळीबार केला होता. यामध्ये दोघेजण थोडक्यात बचावले होते. संबंधीतांनी अक्षय उभे यास पिस्तुलासह हवेली पोलीसांच्या ताब्यात दिले होते.

सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान उभे याने शेगाव येथील व्यक्तींनी गावठी पिस्तूल पुरविल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस हवालदार रामदास बाबर आणि पोलीस नाईक निलेश राणे यांनी रविंद्र उर्फ भिका रमेश खेडकर(वय 29) यास देशमुखपुरा, शेगाव जि. बुलढाणा येथून तर राजू ज्ञानेश्वर सोनवणे(वय 24) यास हरिपेठ, अकोला, जि. अकोला येथून सापळा रचून अटक केली आहे. आरोपी रविंद्र खेडेकर व राजू सोनवणे यांनी आणखी कोणाला बेकायदा पिस्तूल पुरवले याचा शोध हवेली पोलीसांकडून घेण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT