पुणे

माळेगावची परिस्थिती सुधारली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती; ‘सोमेश्‍वर’च्या सभासदांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर : ‘‘माळेगाव साखर कारखाना पुन्हा ताब्यात घेतल्यावर पाहिले तर कारखान्यात अक्षरशः पिचकाऱ्या लागल्या होत्या. साखर अक्षरशः गटारातून वाहत होती. आम्ही तज्ज्ञांच्या मदतीने परिस्थिती सुधारली. अण्णा-काकांनी विस्तारवाढीचं ठरवलं आणि कुणाचंच काही चाललं नाही. मात्र, आताचे संचालक चुकले तर मी जाब विचारू शकतो. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांनीही प्रपंचाचा विचार करून पवारसाहेबांच्या विचारांच्या पॅनेलसोबत राहावे,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सोमेश्‍वरनगर (ता. बारामती) येथील सोमेश्वर पॅलेसमध्ये सत्ताधारी ‘सोमेश्वर विकास पॅनेल’च्या वतीने आयोजित केलेल्या सभासद मेळाव्यात अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘‘माझे चुकले तर पवारसाहेब बोलतात. सोमेश्वर, माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाचे चुकले तर मी जाब विचारू शकतो. पण, स्वबळावर आलेल्या चंदररावअण्णा, रंजनकाका यांनी विस्तारीकरणाचं ठरवलं आणि कुणाचंच ऐकलं नाही.

इतकं खराब काम होतं की, साखर स्प्रे पाँडपर्यंत वाहून जात होती. सव्वा टक्क्यांनी साखर उतारा घटला. मी तज्ज्ञ पाठविले. संचालक मंडळाने सुधारणा करून घेतली. ग्रामपंचायत ते आमदारापर्यंत निवड चुकली तर विकास खुंटतो. पण, कारखान्याची निवड चुकली तर अर्थकारण बिघडते.’’

‘‘राज्यात मी मी म्हणणारे कारखाने आता आजारी आहेत. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सहकारी कारखाने द्यायचे नाहीत, असा निर्णय घेतला. त्यानंतरच्या सर्व सरकारांनी तो कायम ठेवला. राज्य सरकारच्या भागभांडवलाशिवाय ते उभे राहू शकत नव्हते. आता इथेनॉल प्रकल्प उभारणीला हमी देण्याचा, भागभांडवल उभारायला मदत करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे,’’ अशी माहिती पवार यांनी दिली.

ऊसबिलाच्या गुजरात पॅटर्नचे कौतुक

‘‘उसाच्या बिलाची पंधरा दिवसात मागणी असते, पण त्यापासूनच्या साखरेचे पैसे मिळायला वर्ष जाते. रोज शंभर किलोच्या पोत्यावर एक रूपया व्याज जातं. काही वेळा वर्षात ३६५ रुपये व्याज जातं. शेवटी ते शेतकऱ्यांच्या भावातूनच वजा होते. गुजरातमध्ये ऊस गेल्यावर पहिले पेमेंट घेते, दुसरे पेमेंट कारखाना बंद झाल्यावर आणि दिवाळीला तिसरे पेमेंट घेतात. आपल्याकडे मात्र कारखाना हंगाम सुरू होण्याआधीच तोडणी-वाहतुकीला कर्जाची उचल करतात. काही महाभाग मोलासेस, साखरेवर उचल घेतात. असे शंभर कारखाने आहेत. सभासदांनी हे विचारात घ्यावे,’’ असे आवाहन अजित पवार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Cryptic Post: खरा पराभव तेव्हाच होतो, जेव्हा...; विराटच्या पोस्टने सारे चक्रावले, गौतम गंभीरच्या 'त्या' सूचक इशाऱ्याला दिले उत्तर

Doctor Case : धक्कादायक! लग्नानंतर चार महिन्यांतच डॉक्टरने पत्नीला इंजेक्शन देऊन मारले ठार; दोघांत असं काय घडलं?

Veterinary Doctor: पशुवैद्यकीय डॉक्टर होण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे? जाणून घ्या अभ्यासक्रम अन् किती पगार मिळतो

Dhanteras 2025 Wishes In Marathi: धन धान्याची व्हावी घरीदारी रास..! धनत्रयोदशीनिमित्त नातेवाईक अन् मित्रमंडळींना द्या खास मराठीतून शुभेच्छा

'यंदा गोविंदबागेत दिवाळी साजरी न करण्याचा पवार कुटुंबीयांचा निर्णय'; काय आहे कारण? खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'आमच्या काकी...'

SCROLL FOR NEXT