पुणे

चोरे, सरोदे व सांगलीच्या टिमला ‘डॉ. परुळेकर पुरस्कार’

मेजर जनरल राजन कोचर (निवृत्त) यांच्या हस्ते सोमवारी वितरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : यंदाचा डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार नागपूर आवृत्तीतील वरिष्ठ बातमीदार नरेंद्र चोरे, पुणे आवृत्तीतील बातमीदार पांडुरंग सरोदे व सांगलीच्या बातमीदारांच्या ‘टिम’ला जाहीर करण्यात आला आहे. विविध विषयांवर आणि सामाजिक प्रश्‍नांवर सातत्याने लेखन करणाऱ्या ‘सकाळ समूहा’तील बातमीदारांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. स्वातंत्र्यसैनिक व व ज्येष्ठ पत्रकार (कै) ना. अ. पेंडसे यांनी दिलेल्या निधीतून हा पुरस्कार देण्यात येतो.

‘सकाळ’चे संस्थापक संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त येत्या सोमवारी (ता. २०) मेजर जनरल राजन कोचर (निवृत्त) यांचे ऑनलाइन व्याख्यान होणार असून, या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. बनावट क्रीडा प्रमाणपत्र गैरव्यवहार व कोरोना काळात गरीब खेळाडूंच्या व्यथा मांडणाऱ्या बातम्या चोरे यांनी दिल्या.

क्रीडा प्रमाणपत्र गैरव्यवहार प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली व राज्य सरकारने क्रीडा प्रमाणपत्र देण्याची पद्धत अधिक गुणवत्तापूर्ण व पारदर्शक केली. त्यामुळे सच्च्या क्रीडापटूंना न्याय मिळाला. त्याचप्रमाणे गरीब खेळाडूंच्या व्यथांची क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दखल घेतली व १२ खेळाडूंना प्रत्येकी २५ हजारांची मदत केली.

परुळेकर जयंतीनिमित्त सोमवारी राजन कोचर यांचे व्याख्यान

‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि. तथा नानासाहेब परुळेकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त येत्या सोमवारी (ता. २०) मेजर जनरल राजन कोचर (निवृत्त) यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी साडेपाच ते पावणेसात या वेळेत हे व्याख्यान होईल.

‘भारताच्या संरक्षणात्मक दृष्टिकोनातून अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीन’ या विषयावर ते व्याख्यान देणार आहेत. अमेरिकेच्या सैन्य माघारीनंतर अफगाणिस्तानची सत्ता पुन्हा तालिबानने ताब्यात घेतली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. अफ-गाणिस्तानातील घडामोडींना भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणावर तसेच, शेजारील देशांशी असलेल्या संबंधांवरही याचे परिणाम होणार आहेत.

या महत्त्वाच्या विषयावर लष्करातील प्रदीर्घ अनुभव असलेले मेजर जनरल कोचर आपले विचार मांडणार आहेत. मेजर जनरल कोचर यांना ‘विशिष्ट सेवा मेडल''ने गौरविण्यात आले आहे. त्यांनी जम्मू आणि काश्मीर तसेच, ईशान्य भारतात येथे लष्करात विविध पदावर जबाबदारी सांभाळली आहे. सामरिक क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ते कार्यरत आहेत.

पुणे आवृत्तीचे सरोदे यांनी कॉसमॉस बॅकेवर झालेला सायबर हल्ला व त्याच्या तपासाच्या बातम्यांची मालिका करून सहकारी पतसंस्थांची सायबर सुरक्षा प्रणाली सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच, शहरातील सायबर क्राईम संदर्भातील बातम्या व त्यांच्या मागोव्याच्या बातम्या परिणामकारकपणे दिल्या. सांगलीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मिरज रोडवरील ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये ८७ जणांचे बळी गेले होते.

या हॉस्पिटलमध्ये सुविधांचा अभाव होता. या प्रकरणी सांगलीतील बातमीदारांच्या टीमने मिळून वृत्तमालिका प्रसिद्ध करून यातील गंभीर बाबी उघडकीस आणल्या. सांगली पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर असून, लवकर त्याची सुनावणी सुरू होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT