पुणे

राज्यातील आगामी निवडणूका मनसे व जनता दल यांनी एकत्र लढवावी

राज्याचे जनता दल ( सेक्युलर ) पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष नाथा शेवाळे यांनी दिली.

युनूस तांबोळी

राजंणगाव गणपती : राज्यातील आगामी महानगर पालिका, नगरपालिका, जिल्हा परीषद, पंचायत समिती या निवडणूकीबाबत मनसे व जनता दल एकत्र येऊन लढवावी. याबाबत सकारात्मक चर्चा महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गुरूवार ( ता. १४ ) मुंबई येथील कृष्णकूंज निवासस्थानी झाल्याची माहीती राज्याचे जनता दल ( सेक्युलर ) पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष नाथा शेवाळे यांनी दिली.

मुंबई येथे राज ठाकरे यांच्या शी चर्चा झाल्यावर सकाळ प्रतिनिधीशी ते बोलत होते. राज्याच्या विधानसभा व विधानपरिषदेत जनता दलाचे प्रतिनिधीत्व नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. शेवाळे म्हणाले की, माजी पंतप्रधान व जनता दल सेक्युलर पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष एच. डी. देवगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील इतर पक्षाशी चर्चा करून राज्यात युती च्या माध्यमातून प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी व राजकीय समिकरण जुळविण्यासाठी राज्यात सर्वच पक्षाशी चर्चा केली जात आहे.

मुबंई येथे आगामी निवडणूकीबाबत चर्चा करताना मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे व जनता दलाचे ( सेक्युलर ) पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष नाथा शेवाळे

२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात दादासाहेब जाधवराव हे जनता दलाचे कृषीमंत्री होते. २००८ मध्ये विधानपरीषदेत शरद पाटिल यांनी जनता दलाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर राज्यात विधान सभेत व विधानपरिषदेत जनता दलाला प्रतिनिधित्व मिळाले नाही. काँग्रेस चे जनता दलाशी जुळत नाही. युती बाबत कम्युनिष्ट व शेतकरी पक्षाशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी आगामी निवडणूकीसाठी सकारात्मक चर्चा झाली. भविष्यात यावर चर्चा करू असेही ठाकरे यांनी सागितल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज येथे जनता दलाचा नगराध्यक्ष आहे. मालेगाव येथे विरोधी पक्ष नेता म्हणून जनता दलाचे बलस्थान आहे. भविष्यात मनसे व जनता दल एकत्रीत आल्यास राज्यातील विधानसभा व विधानपरिषदेत प्रतिनिधीत्व मिळवू. जनता दलाकडे अल्पसंख्याक, मुस्लिम, दलित समाजाचे मतदार असून मनसेकडे मराठा समाजाचे मतदार आहेत. त्यातून राज्याच्या राजकारणाचे समीकरण जुळवू आणी प्रतिनिधीत्व मिळवू असेही शेवाळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT