Pune Crime News  sakal
पुणे

Pune Crime News : कोयता हवेत फिरवत तरुणाची ‘स्टंटबाजी’ ; सुभाषनगरमधील घटना, स्थानिक रहिवाशांकडून संताप

तरुणाने कोयता हवेत फिरवत महाविद्यालयीन युवतींसमोर ‘स्टंटबाजी’ केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार पेठ परिसरातील सुभाषनगरमध्ये सोमवारी दुपारी घडला. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तरुणाने कोयता हवेत फिरवत महाविद्यालयीन युवतींसमोर ‘स्टंटबाजी’ केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार पेठ परिसरातील सुभाषनगरमध्ये सोमवारी दुपारी घडला. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी खडक पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

महेश सिदाप्पा भंडारी (वय २२, रा. जनता वसाहत, पर्वती) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाषनगरमधील एका महाविद्यालयातील युवती महाविद्यालयातून घरी निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीवर आलेल्या त्यांच्या ओळखीच्या तरुणांपैकी एकजण हवेत कोयता फिरवत होता. हा प्रकार बघून युवती घाबरून निघून गेल्या. याबाबत दोघा नागरिकांनी त्याला जाब विचारला. त्या वेळी तरुणाने त्यांना दमबाजी केली.

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘सुभाषनगर भागात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार सुरू असतात. आजची ही घटना बघून आमच्या अंगावर शहारा आला. या भागात दामिनी पथकासह पोलिस गस्त वाढविण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे केली होती, परंतु अद्याप कारवाई झालेली नाही. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी.’

या घटनेबाबत मुलींची तक्रार नाही, परंतु घटनेचे गांभीर्य लक्षात घेत हवेत कोयता फिरवणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे. अशा घटना रोखण्यासाठी पोलिस गस्त वाढविण्यात येणार आहे.

- संदीपसिंग गिल, पोलिस उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : लव्हस्टोरीतून एमपीएससीचा पेपर फुटला; प्रेमासाठी पेपर फोडल्याने यंत्रणा हडबडून जागी, असं काय घडलं?

गोड साखरेचा कडू इतिहास! युरोपातील राजे-महाराजे 'या' खास कारणासाठी करायचे साखरेचा वापर

कुकू कोहलींच्या अंत्ययात्रेत लेकीनं दिला खांदा; वडिलांना अखेरचा निरोप देताना करिश्मा कोहली भावूक

Panchganga Pollution: ‘एसटीपी’ उभारणीच्या दिरंगाईचा अहवाल द्या; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडेंचे आदेश; कोल्हापुरात येऊन पाहणी करणार

वैभव सूर्यवंशीच्या टेस्ट ड्रीमला मोठा धक्का? राहुल द्रविड यांनी सांगितली मोठी अडचण; म्हणाले, ‘अजून बराच पल्ला गाठायचा आहे’

SCROLL FOR NEXT