crime sakal
पुणे

...अवघ्या आठच दिवसात हॉटेलच्या व्यवस्थापकाने केला 'हात साफ' !

'तो' आठच दिवसांपुर्वी जंगली महाराज रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून कामाला लागला.

सकाळ वृत्तसेवा

'तो' आठच दिवसांपुर्वी जंगली महाराज रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून कामाला लागला.

पुणे - 'तो' आठच दिवसांपुर्वी जंगली महाराज रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून कामाला लागला. काही दिवस त्याने हॉटेलचे आर्थिक व्यवहार हाताळतानाच तेथील हालचालही पाहीली आणि आठ दिवसानंतर त्याने हॉटेलच्या गल्ल्यातील 22 हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. शिवाजीनगर पोलिसांनीही त्याला तितक्‍याच शिताफीने अवघ्या बारा तासाच्या आत अटक केली.

अजय सुरेश सक्‍सेना (रा. लिंकरोड, मुंबई, मूळ. रा. उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या व्यवस्थापाचे नाव आहे. याप्रकरणी हॉटेलची देखभाल पाहणाऱ्या व्यक्तीने फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगली महाराज रस्त्यावर "हॉटेल रिजेंट' या नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये सक्‍सेना हा आठ दिवसांपुर्वी व्यवस्थापक म्हणून कामाला लागला होता. त्यास रात्रपाळीच्या कामाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार, तो दररोज ग्राहकांकडून पैसे घेऊन हॉटेलचा आर्थिक व्यवहार सांभाळत होता.

सात दिवस त्याने त्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. त्यानंतर 16 मे रोजी रात्री त्याने नेहमीप्रमाणे काम केले, दुसऱ्या दिवशी सकाळी गल्ल्यात जमा झालेले 22 हजार रुपये घेऊन तो पळून गेला. हा प्रकार हॉटेलची देखभाल पाहणाऱ्यांच्या लक्षात आला. त्यानुसार, त्यानी तत्काळ शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तांत्रिक तपासालाही गती दिली. त्यावेळी तो मुंबई येथे असल्याचे समजल्यानंतर एक पथक मुंबईला गेले, मात्र काही तासांनी तो पुन्हा

पुण्यात बुधवार पेठेमध्ये फिरत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी त्यास सापळा रचून अटक केली. त्यास दारुचे व्यसन असून त्याने मौजमजेसाठी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 17 हजार रुपयांची रक्कम जप्त केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांच्या पथकाने हि कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT