Theft
Theft 
पुणे

सुटाबुटात आलिशान मोटारीतून घरफोड्या

सकाळवृत्तसेवा

येरवडा - सूटबूट घालून, आलिशान मोटारीतून येऊन घरफोड्या व चोरी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना येरवडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे ८४ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, ९७ हजार रुपये रोख व एक आलिशान मोटार, असा १८ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांनी शहरात तब्बल ८८ गुन्हे केल्याची माहिती परिमंडल चारचे पोलिस उपायुक्त प्रसाद आक्कानवरू यांनी दिली.

आक्कानवरू म्हणाले, ‘‘संशयित जयवंत ऊर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय ३२, रा. डिपी रस्ता, औंध) व नितीन ऊर्फ हुबळ्या शंकर जाधव (वय २५, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) हे घरफोड्या व चोऱ्या करीत होते. चौकशी केल्यानंतर त्यांनी शहरात तब्बल ८८ घरफोड्या व चोऱ्या केल्याचे कबूल केले. त्यापैकी येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंधरा गुन्ह्यांचा समावेश आहे.’’
संशयितांना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

दिवसा पाकीटमारी; रात्री घरफोड्या
जयवंत गायकवाड हा घरफोड्या करणारा, तर नितीन जाधव हा पाकीटमार करीत होता. दोघांची येरवडा कारागृहात ओळख झाली. ते बाहेर पडल्यानंतर एकत्र घरफोड्या व चोऱ्या करू लागले. चोरीच्या पैशातूनच त्यांनी एक आलिशान मोटार खरेदी केली. त्यानंतर ते सुटाबुटात मोटारीने रात्रीच्या वेळी घरफोड्या करीत असत, तर दिवसा बसमध्ये पाकीटमारी करीत असत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT