पुणे

प्रवासादरम्यान गुंगीचा पेढा भरवून वरमाईला अडीच लाखांचा गंडा

पांडुरंग सरोदे -सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुलाच्या लग्नासाठी मुंबईहून पुण्याला एसटीने येणाऱ्या महिलेस सहप्रवासी महिलेने गुंगीचा पेढा खाण्यास देऊन महिलेकडील रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने असा अडीच लाख रुपयांचा ऐवज लुटला. याप्रकरणी अनोळखी महिलेवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईतील सायन कोळीवाडा भागात राहणाऱ्या 50 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीचा मुलगा पुण्यामध्ये राहतो. त्याचे काही दिवसात लग्न असल्याने महिला मुलाच्या लग्नासाठी 28 एप्रिलला पुण्याला निघाल्या होत्या. त्या मुंबईतील दादर येथून एसटी बसने जात होत्या. त्यावेळी त्यांच्या शेजारी काळ्या रंगाचा कुर्ता व काळ्या रंगाचा सलवार परिधान केलेली 40 ते 45 वर्षे वयाची महिला बसली. प्रवासादरम्यान महिलेने फिर्यादीशी गप्पा मारण्यास सुरूवात केली. त्यानंतर हळूहळू फिर्यादीची सगळी माहिती काढून घेतली.

फिर्यादीचे पुण्याला जायचे काय कारण आहे, असे विश्‍वासात घेऊन विचारले. त्यामुळे फिर्यादीनेही तिच्यावर विश्‍वास ठेवून त्यांची वैयक्तीक माहिती दिली. काही वेळाने दोघींच्या गप्पा रंगल्या. त्यावेळी संबंधीत महिलेने फिर्यादीस तिच्याकडील पेढा खाण्यास दिला. फिर्यादीने पेढा खाल्यानंतर त्यांना गुंगी येऊ लागली. तसेच जीभ जड होऊ लागली. पुणे स्टेशन येथे उतरल्यानंतर महिलेने फिर्यादीस ससून रूग्णालयात उपचारांसाठी नेण्याचा बनाव केला. त्यानंतर रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर येथे तुमचा एक्‍सरे काढावा लागेल, त्यासाठी तुमच्याकडील दागिने, रोख रक्कम माझ्याकडे द्या, असे सांगून महिलेकडील अडीच लाख रुपयांचा ऐवज घेऊन महिलेने तेथून पोबारा ठोकला. महिला शुद्धीत आल्यानंतर त्यांनी थेट बंडगार्डन पोलिस ठाणे गाठून पोलिसांकडे फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीश ठाकुर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT