खडकवासला येथे भरदिवसा लॅपटॉप आणि प्रिंटर चोरी; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद sakal
पुणे

खडकवासला येथे भरदिवसा चोरी; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भरदिवसालॅपटॉप आणि प्रिंटर चोरी

निलेश बोरुडे

खडकवासला : खडकवासला गावच्या हद्दीत मुख्य सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या कार्यालयातील एक लॅपटॉप आणि एक प्रिंटर अशा सुमारे वीस हजार रुपयांच्या मुद्देमालाची दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भरदिवसा चोरी केली असून चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.याबाबत हवेली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

खडकवासला गावचे माजी उपसरपंच संदीप मते यांचा सिमेंट विक्रीचा व्यवसाय आहे. मुकाई स्टील ॲंड सिमेंट एजन्सी या नावाने असलेल्या त्यांच्या खडकवासला येथील कार्यालयात पंधरा कर्मचारी कामाला आहेत.रोख रक्कम, चेक, कंप्युटर, लॅपटॉप, प्रिंटर व व्यवसायाच्या संबंधित इतर वस्तू व कागदपत्रे असा मुद्देमाल त्यांच्या कार्यालयात असतो.

रविवार दि. 17 ऑक्टोबर रोजी सुट्टी असल्याने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारे जयेश इंगुळकर हे एकटेच कार्यालयात काम करत बसले होते.दुपारी दिड वाजेच्या सुमारास इंगुळकर काही कामानिमित्त आतल्या खोलीत गेल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कार्यालयातील लॅपटॉप व प्रिंटर या वस्तूंची चोरी केली. सोमवार दि. 18 ऑक्टोबर रोजी नियमित कार्यालय सुरू झाल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तपासणीतून हा प्रकार उघडकीस आला. तोंडाला मास्क लावलेला असल्याने चोरांची ओळख पटू शकली नाही. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून महिला पोलीस नाईक रुपाली धिवार अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri 2159 Crore Investment : महाराष्ट्रात 82,655 कोटींची विक्रमी गुंतवणूक; 1.55 लाख तरुणांना मिळणार रोजगाराच्या संधी, उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

Mumbai MHADA: मुंबईत म्हाडाच्या सात मजली इमारतीचा प्लास्टर कोसळला; १७ वर्षीय मुलीसह तिघे जखमी

Mhada: उमरखाडीचा समूह पुनर्विकास, रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर मिळणार; म्हाडाचा राज्य सरकारकडे प्रस्ताव

Marathi News Live Updates : चिपळूण उड्डाणपुलाची आज पाहणी; नागरिकांच्या तक्रारीची दखल, कामाच्या दर्जाबाबत शंका

झी मराठीवर स्टार प्रवाहच्या हिरोची एन्ट्री; ‘धाकट्या सूनबाई’साठी 'या' अभिनेत्याचं नाव पक्कं?

SCROLL FOR NEXT