Garden 
पुणे

फुलझाडे अन्‌ मुलांसाठी विविध मैदानेही

सकाळ वृत्तसेवा

नवी सांगवी - पिंपळे गुरव सृष्टी चौकात नव्याने विकसित होत असलेले खेळाच्या उद्यानाचे काम प्रगतिपथावर असून, लवकरच ते बालचमूंना सरावासाठी खुले होणार आहे. दीड एकरातील या उद्यानात फुलझाडे, खुले नाट्यगृह, हिरवळ, ॲक्‍युप्रेशर वॉक वे, कारंजे व वाहनतळ याबरोबर विविध खेळांची मैदाने उपलब्ध असतील.

उद्यानाच्या प्रवेशद्वारावर खेळाडूंची चित्र साकारली जाणार आहेत. त्यामुळे फुलझाडांबरोबर विविध खेळांची मैदाने मुलांसाठी उपलब्ध असणार आहेत. ‘ड’ प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम म्हणाले, ‘‘पवनेच्या काठावर उभारले जात असलेल्या या उद्यानात फुलझाडे व खेळाची मैदाने याचा संगम घातला आहे. लहान मुलांना त्यांच्या संस्कारक्षम वयातच खेळाची गोडी लावली, तर भविष्यात चांगले खेळाडू तर होतील. परंतु निरोगी व निरायम जीवनशैलीही जोपासली जाईल.’’ 

कार्यकारी अभियंता देवण्णा गट्टुवार म्हणाले, ‘‘केवळ पिंपळे गुरवमध्येच नाही तर संपूर्ण शहरात असे खेळाचे उद्यान साकारले जात आहे. साधारण येणाऱ्या मार्चअखेर याचे काम पूर्ण होऊन उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मुलांना या उद्यानाद्वारे खेळांची एक नवी पर्वणीच 
मिळणार आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTAच्या कारभारात मोठा बदल; IAS-IPS सह ३ अधिकाऱ्यांची नियुक्ती, ३ आठवड्यांत रुजू होण्याचे आदेश, केंद्राचा महत्त्वाचा निर्णय

Bangladeshi Infiltrators Arrested : पुण्यात तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक; विशेष शाखा व लष्करी गुप्तचर यंत्रणेची कारवाई

Nepal Flood Viral Video: नेपाळमधील महापुरात 'ते' एकच घर कसं अभेद्य राहिलं? पुढे काय झालं? सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Nepal Flood: महापुराने संपूर्ण शहर वाहून नेलं, पण संकटाची चाहूल आधीच होती; नेपाळला दिलेला इशारा का दुर्लक्षित झाला?

राखीच्या धाग्याने बांधलं आपुलकीचं नातं; डोंबिवलीत हजारो भगिनींसोबत रविंद्र चव्हाण यांचा रक्षाबंधन सोहळा

SCROLL FOR NEXT