pmc. 
पुणे

महापालिकेत कोरोनावर चर्चा नाहीच;  विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना आणि त्यावरील उपाययोजनांवरील चर्चा करा, या विरोधी पक्षाने केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष करीत सत्ताधारी भाजपने मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशीही सर्वसाधारण सभा तहबूक केली. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यावर चर्चा करू, असे आश्‍वासन यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले. 

कोरोनाचे रुग्ण शहरात सापडू लागल्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात सर्वसाधारण सभा होऊ शकली नाही. जून महिन्यात सर्वसाधारण सभा पार पाडण्याची तांत्रिकता फक्त सत्ताधाऱ्यांकडून पूर्ण करण्यात आली. तेव्हा विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी कोरोनाची सध्यस्थिती आणि उपाययोजनांची माहिती, खर्चाचा तपशील द्यावा अशी मागणी केली होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सभागृहात सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने सभागृह फार काळ चालविणे सयुक्तिक ठरणार नाही, असे कारण देत सत्ताधारी भाजपने सभाच तहकूब केली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान गेल्या आठवड्यात ऑनलाइन सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यावेळीही नगरसेवकांनी कोरोनाच्या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली. परंतु त्याकडेही दुर्लक्ष करीत सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे आज झालेल्या सर्वसाधारण सभेत कोरोना आणि त्यावर उपाययोजना आदी विषयांवर चर्चा करण्याची मागणी पुन्हा नगरसेवकांनी लावून धरली. तेव्हा महापौर मोहोळ यांनी तुमच्या मागणीविषयी सभेचे कामकाज संपल्यानंतर त्वरित प्रशासनाबरोबर बैठक लावण्यात येईल असे सांगितले. तरी नगरसेवकांनी आग्रह धरल्यानंतर महापौर मोहोळ यांनी पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांना या विषयावर बोलण्याची संधी दिली जाईल, असे सांगत सभा उरकती घेतली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT