Apartment
Apartment 
पुणे

फ्लॅट, घर तारण ठेवणार आहात? वाचा महत्त्वाची बातमी

सकाळवृत्तसेवा

पुणे,ता. 9 : तुम्ही बॅंकेकडून कर्ज घेत आहात.. त्यासाठी तारण म्हणून फ्लॅट/फ्लॉटची कागदपत्रे बॅंकेत जमा करीत आहात.. त्यानंतर "नोटीस ऑफ इंटीमेनश' द्यायला दुय्यम निबंधक कार्यालयात समक्ष जाण्याची आता गरज नाही. घर बसल्या स्वत: अथवा दुसऱ्याच्या मदतीने तुम्हाला "नोटीस ऑफ इंटीमेशन' देता येणार आहे. त्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून ई फायलींग प्रणालीत बदल केला आहे. त्यामुळे हे आता शक्‍य होणार आहे. 

कर्ज घेताना जर साध्या गहाण ठेवण्याच्या पद्धतीने कर्ज घेतले तर त्यासाठीचे गहाणखत दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदवावे लागते, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इक्विटेबल मॉर्गेज ही दुसरी एक पद्धत आहे. ज्यामध्ये कर्जदार तारण म्हणून आपल्या फ्लॅट/प्लॉट/शेती अशा स्थावर मिळकतीच्या मालकी हक्काची कागदपत्रे जसे की खरेदीखत, विक्री करारनामे संबंधित बॅंकेच्या ताब्यात देतो . कर्ज फिटेपर्यत ही कागदपत्रे बॅंकेकडे राहतात. या पद्धतीने कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना दुय्यम निबंधक यांच्याकडे "नोटीस ऑफ इंटीमेशन' दाखल करावी लागते. त्यासाठी कर्जदारास दुय्यम निबंधक कार्यालयात स्वत: हजर राहावे लागते. अथवा ज्या बॅंकेकडून कर्ज घेतले , त्या बॅंकेच्या शाखेकडून इ-फायलींग प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन फायलींग करता येते. मात्र ही ई-फायलींग सुविधा तुरळक बॅकांनीच आपल्या कर्जदारांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बहुतांशी बॅंका अथवा वित्तीय संस्थाच्या कर्जदारांना दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष जाऊनच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. 

कोरोनाचं संकट हे भारतासाठी एक संधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोविड-19 प्रार्दुभावाच्या पार्श्‍वभूमीवर नागरीकांना जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे कर्जदारास स्वत:ची नोटीस स्वत: ऑनलाइन फायलींग करता येईल, अशी ई फायलींग ही सुधारीत प्रणाली नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांच्या वेळेत बचत होण्याबरोबरच दुय्यम निबंधक कार्यालयात अनावश्‍यक होणारी गर्दी टाळणे शक्‍य होणार आहे. 

अशा प्रकारे करता येईल फायलींग 

या सुधारीत प्रणालीमुळे संगणक, इंटरनेट आणि प्रिंटर उपलब्ध असलेल्या कोणत्याही नागरीकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या प्रणालीमध्ये कर्जव्यवहाराची माहिती, कर्ज रकमेच्या 0.2 टक्के मुद्रांक शुल्क, एक हजार रूपये फायलींग फी व दस्त हताळणी शुल्क यांचा तपशील भरल्यानंतर कर्जदाराने स्वत:चा फोटो वेब कॅमेरा किंवा स्मार्ट फोन माध्यमातून अपलोड करून ओळख पटविण्यासाठी आधार क्रमांक टाकल्यानंतर नोटीस तयार होणार आहे. त्या नोटीसची प्रिंट काढून त्यावर स्वाक्षरी करून आणि संबंधित बॅंकेकडून साक्षांकीत करून घ्यावी. ती नोटीस स्कॅन करून पीडीए फाईल प्रणालीमध्ये अपलोड दाखल करावयाची आहे. त्यामुळे कर्जदाराला तीस दिवसांच्या मुदतीत ती सादर करण्याचे असलेले बंधन पाळणे देखील शक्‍य होणार आहे. 

ही प्रणाली नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन सर्व्हिेसेस या सदराखाली ई फायलींग (नागरीक) या नावाने उपलब्ध आहे. ही प्रणाली सध्या पुणे शहर , पुणे ग्रामीण, मुंबई आणि मुंबई उपनगर या चार जिल्ह्यांकरिताच लागू करण्यात आली आहे. उर्वरीत जिल्ह्यांसाठी लवकरच ती लागू करण्यात येणार आहे. ही प्रणाली कशी वापरावी यांची माहिती पुस्तिका देखील संकेतस्थळावर उपलब्ध असून काही शंका असल्यास 8888007777 या हेल्पलाइन वर संपर्क साधावा, असे आवाहनही खात्याकडून करण्यात आले आहे. 

नागरीकांच्या सोयीसाठी ई फायलींगच्या प्रणाली सुधारणा करण्यात आली आहे. सध्याची पद्धत आणखी सुटसुटीत करण्यात आली असून त्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, असं  नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT