khadakwasla 
पुणे

तलाव, पाझर तलावात पाणी सोडण्याची खडकवासला कालव्याद्वारे तरतुद नाही

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : खडकवासला प्रकल्पातील लाभक्षेत्र व जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी पाणी देण्याची तरतूद आहे. परंतू लाभ क्षेत्रातील लघु पाटबंधारे तलाव, पाझर तलावात पाणी सोडण्याची खडकवासला कालव्याव्दारे तरतुद नाही. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली. 

खडकवासला धरणातील पाणी मुठा नदीत विसर्ग सोडल्यानंतर शेवटी अगोदर जवळ नंतर (टेल-टु-हेड) अशा पध्दतीने नवीन मुठा उजवा कालव्याव्दारे 16 जुलै पासून सिंचनासाठी आवर्तन सुरू करण्यात आलेले
आहे. सध्या सिंचनासाठीचे आवर्तन यवत व पाटस भागात सुरू आहे. सध्या लाभक्षेत्रात पाऊस नसल्यामुळे पिकांना पाणी देण्याची शेतक-यांची मागणी असल्यामुळे उभ्या पिकांना पाणी देण्यात येत आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे भादलवाडी, पोंधेवाडी व मदनवाडी तलावात कायमस्वरूपी पाणी सोडण्यासाठी याचिका दाखल करण्यात आलेली होती. या संदर्भात एक तक्रार अर्ज आला होता. त्यावर, पुणे येथील प्राथमिक विवाद निवारण अधिकारी तथा मुख्य अभियंता (विप्र), यांनी दिलेल्या निकालानुसार प्रकल्प अहवालात तरतूद नसल्यामुळे तलावात पाणी सोडता येणार नाही. असा निर्णय दिलेला आहे.

दौंड, इंदापूर तालुक्यात एकुण 13 लघु पाटबंधारे विभागाचे तलाव आहेत. त्यामध्ये सिंचनासाठी व पिण्यासाठी कालव्याव्दारे पाणी देण्याची शेतक-यांची आग्रही मागणी होत आहे. तरंगवाडी व मदनवाडी तलावात इंदापूर तालुक्यातील शेतक-यांनी आंदोलने सुरू केली आहेत. तथापी तलावात पाणी सोडण्याची तरतूद खडकवासला प्रकल्प अहवालात नाही. म्हणून या तलावामध्ये कायमस्वरूपी पाणी देण्याची तरतुद नाही.  

आवर्षण / दुष्काळी परिस्थितीमध्ये महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण 11.12 अंतर्गत उजनी धरण 66 टक्के भरल्यानंतर समन्यायी तत्वावर खडकवासला प्रकल्पातून पाणी दिले जाऊ शकते. त्यामुळे सध्या उभ्या पिकांचे सिंचन संपल्यानंतर तसेच जनाई व शिरसाई या योजनेसाठी पुरेशे पाणी दिल्यानंतर उपलब्ध असलेल्या पाण्याचा आढावा घेवून खडकवासला समुह प्रकल्पाचा भरून वाहत असल्यास टंचाई भागातील तलावात पाणी सोडण्यात येईल. असे ही शेलार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाईमुळे शिर्डी साई मंदिराचा मोठा निर्णय! आता एकच लाडू प्रसाद मिळणार; प्रसादालयाच्या मेनूमध्येही मोठा बदल

"आई आगीत होरपळलेली आणि मला लीड रोल मिळाल्याचा फोन आला" शुभविवाह फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

Dhule Bus Stand : धुळ्यातील एसटी प्रवासाचा कायापालट! चार स्थानकांचा 'एअरपोर्ट' सारखा विकास, ९० नवीन बसेस दाखल

Video Viral: जसप्रीत बुमराह हा जलदगती गोलंदाजांमधला उस्मान तारिक; फेकाड्या पाकिस्तानी गोलंदाजासोबत जस्सीची बरोबरी

वागळे की दुनिया फेम भारती आचरेकरांचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण ! ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेचा प्रोमो चर्चेत

SCROLL FOR NEXT