पुणे

उमेदवारीबाबत विखेंशी चर्चा नाही - शरद पवार 

सकाळवृत्तसेवा

पुणे - नगरमधून सुजय विखे हे "राष्ट्रवादी'चे लोकसभेचे उमेदवार असतील, या चर्चेला "राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. ""अशी कुठलीच चर्चा नसून, उमेदवार निश्‍चितीसंदर्भात येत्या सात मार्चला पक्षाची बैठक होणार आहे,'' असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

याबाबत सुजय विखे यांच्याशी कुठलीच चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकचं राजकारण सत्ताधारी करत असल्याचा आरोपही पवार यांनी केला. ""आमचा सैन्यदलावर विश्वास आहे. मी संरक्षणमंत्री राहिलो आहे. अशा कारवाईनंतर सरकारबाहेरच्या व्यक्तीनं आकड्यांविषयी बोलणं योग्य नाही,'' असे सांगत त्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका केली. त्याचप्रमाणे घरात घुसून मारू, असं मोदीच म्हणत आहेत. तेव्हा राजकारण आम्ही नाही, तर तेच करत आहेत, असेही पवार म्हणाले. हल्ल्यात मारले गेलेल्यांची आकडेवारी आणि त्याबाबत जे भाष्य पंतप्रधान करताहेत ते पंतप्रधानपदाला शोभत नाही, अशी टीकाही पवार यांनी मोदींवर केली. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT