shugarcane 
पुणे

साखर उद्योगाबाबत या आहेत सरकारकडून अपेक्षा 

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर (पुणे) : कोरोनाशी दोन हात करत राज्यातील कारखान्यांनी सर्व ऊस संपविला. मात्र, साखरेसह अल्कोहोल, वीज आदी उपपदार्थांची विक्री ठप्प आहे. ऐंशी ते शंभर टक्के साखर शिल्लक असून, साखर ठेवायला जागा नाही. त्यामुळे कारखानदारी आर्थिक कोंडी झाली आहे.

केंद्र सरकारने साखरेसह इथेनॉल, एक्‍सट्रान्यूट्रल अल्कोहोल (इएनए) याच्या निर्यातीची व्यवस्था करावी. साखर उद्योगास मदतीचा हात द्यावा, अशी मागणी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केली. 

कोरोनाचे संकट असतानाही राज्यातील कारखान्यांनी सर्व ऊस संपविला आहे. परंतु, या हंगामात डिस्टीलरीमधील रेक्‍टीफाईड स्पिरिट (आरएस), "इएनए', इथेनॉल हे विक्रीअभावी कारखान्यांकडे शिल्लक आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रचंड घसरले आहेत. परिणामी ऑईल कंपन्यांकडून इथेनॉल पुरवठ्याचे कारखान्यांशी करार झालेले असतानासुद्धा त्याची उचल होत नाही. लॉकडाउन असल्याने डिझेल- पेट्रोलचा खपही कमी झाला आहे. अशात तेल स्वस्त झाल्याने पेट्रोल कंपन्यांना इथेनॉल खरेदी करणे परवडणारे राहिलेले नाही. ब्राझीलसारख्या देशाने या पुढे इथेनॉलनिर्मिती न करता साखर उत्पादनाकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत देशी दारु विक्री बंद असल्यामुळे "आरएस'ची मागणीही घटली आहे. उद्योगधंदे बंद असल्याने विजविक्री होत नाही. या परिस्थितीमुळे कारखान्यास आर्थिक तोशीस बसत आहे. विजकंपनीस विकलेल्या विजेचे पैसे मिळण्यात विलंब होत आहे.

कोरोनामुळे लग्नसराई, सण बंद आहेत, तसेच हॉटेल, मिठाई, चॉकलेट, शीतपेये हे उद्योगही बंद असल्याने साखरेची मागणी पूर्णतः थांबली आहे. केंद्र सरकारकडून जो साखर कोटा दिला जातो, तो मागणीच्या तुलनेत खूप जास्त आहे. परिणामी कारखान्यांची 80 ते 100 टक्के साखर शिल्लक आहे. साखरेपोटी बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज वाढत चालले आहे. या गोष्टींनी आर्थिक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर साखर कारखानदारीसाठी मदतीचे धोरण ठरवावे, अशी मागणी जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. 

सरकारने योग्य पर्याय काढला; तरच सहकारी साखर कारखानदारी व शेतकरी हे या अडचणीला तोंड देऊ शकतील. चांगल्या पावसामुळे आगामी हंगामासाठी जादा ऊस उपलब्ध होणार आहे. शेतकरी बांधवांनीसुद्धा अडचणी लक्षात घेऊन यापेक्षा अधिक ऊस वाढवण्यापेक्षा इतर पिकांचा देखील पर्याय शोधला पाहिजे. 
- पुरुषोत्तम जगताप
अध्यक्ष, सोमेश्वर साखर कारखाना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Mumbai Crime : मोबाईलवर गेम खेळताना पाहून संतापला पिता, चार वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या अन्...

Pune News : देशी गोवंश संवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT