पुणे

विलगीकरण कक्षात असायला हव्यात 'या' मूलभूत सुविधा

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा सामना करताना महापालिका आणि जिल्हा प्रशासनात यांच्यात पुरेसा समन्वय नसल्यामुळे सक्षम यंत्रणा उभी राहण्यात अडचणी येत असल्याचे खासदार वंदना चव्हाण यांनी विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणले आहे. महापालिकेच्या विलगीकरण कक्षात पिण्याचे पाणी, अस्वच्छता आदी गंभीर समस्यांचा सामना संशयितांना करावा लागत असल्याचेही म्हटले आहे.

खासदार चव्हाण यांनी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासमवेत पुण्यातील कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतला. प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत नागरिक, लोकप्रतिनिधींना नेमकी माहिती मिळावी, यासाठी पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच सक्षम यंत्रणा निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, गरज भासल्यास त्यांची मदत घ्यावी, अशी सूचनाही चव्हाण यांनी विभागीय आयुक्तांना केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रक्तदान शिबिरात घ्यायची दक्षता, गर्भवतींच्या आरोग्याची काळजी, रुग्णवाहिकांची कमतरता आदी मुद्द्यांवरही डॉ. म्हैसेकर यांच्याशी खासदार चव्हाण यांची चर्चा झाली. त्यांनी सर्व मुद्द्यांची नोंद घेतली असून याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. आमदार चेतन तुपे, महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे हे या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.

प्रशासनाने काय करावे?

- विलगीकरण कक्षांत मूलभूत सुविधांची कमतरता आहे. तेथील खोल्या व स्वच्छतागृहांची अस्वच्छता असून, टेस्टिंग यंत्रणा, टेस्टिंग अहवाल येण्यामध्येही दिरंगाई होत आहे.

- न्याहारी, जेवण, चहाच्या निमित्ताने बाधित आणि संशयित काही वेळ एकत्र येण्याचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे घाबरून रुग्ण पळून जाण्याच्या घटना घडत आहेत. तसेच संशयित रुग्ण येथे येण्यास टाळाटाळ करू शकतील. त्यातून नव्या समस्या उद्भवू शकतात.

- विलगीकरण केंद्रात संशयितांना देण्यात आलेल्या बिछान्यावर बेडशीट नसल्याचे दिसून आले आहे. तसेच बिछान्याच्या निर्जंतुकीरणाची व्यवस्था नसल्याने रुग्ण धास्तावतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

- कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी महापालिकेबरोबर काम करू इच्छिणाऱया डॉक्टर तसेच गणेश मंडळांचे कार्यकर्ते यांना प्रशिक्षण देऊन आवश्यक ते किटही देण्यात यावेत.

- शिक्षक, समूह संघटिका करीत असलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून संशयित शोधण्यावर लक्ष केंद्रीत करावे. तसेच त्यांच्या आरोग्यासाठी सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्हज पुरविण्यात यावे. जागेवरच तपासणी करण्यासाठी थर्मोमीटर उपलब्ध करून द्यावेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

- खासगी पॅथ लॅबमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यास त्याची माहिती महापालिका यंत्रणेस पाठविण्यास बंधनकारक करण्यात यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT