devdut 
पुणे

पूरग्रस्त जनावरांसाठी ते ठरले "देवदूत'  

सकाळ वृत्तसेवा

यवत (पुणे) :  दौंड तालुका पशुवैद्यक पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन संघाने आपल्या सदस्यांची पथके टप्प्या टप्प्याने पूरग्रस्त भागात पाठवून तेथील जनावारांवर औषधोपचार करण्याचे काम सुरू केले आहे. "आमच्या जनावरांसाठी देवदूत बनून आलात' अशी भावना तेथील शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

सांगली येथील श्री समस्त श्वेतांबर मूर्तिपूजक संघ मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. दौंड येथील दहा पशुवैद्यकांचे पथक सध्या येथे कार्यरत आहेत. पुरग्रस्तांची मदत करताना तेथील माणसांचा विचार प्रामुख्याने होतो. मात्र तेथे जनावरांची स्थितीही गंभीर आहे. त्यांना चाऱ्या सोबत औषधे आणि उपचार करणाऱ्या डॉक्‍टराची मोठी गरज आहे. ही गरज ओळखून "दौंड तालुका पशुवैद्यक पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन संघाने' या भागासाठी सेवा देण्याचे नियोजन केले. येथे सेवेसाठी जाणाऱ्या पथकांच्या राहण्या- जेवणाची सोय श्री समस्त श्वेतांबर मूर्तिपूजक संघातर्फे करण्यात आली आहे. पशुवैद्यक संघाचे दौंड तालुका अध्यक्ष डॉ. शांताराम वाघमोडे हे पहिल्या पथकाचे नेतृत्व करत आहेत. 

डॉ. वाघमोडे म्हणाले, ""येथे जनावरांची अवस्था वाईट आहे. अनेक दिवसांच्या उपासमारीमुळे थकवा, अशक्तपणा, ताप, अंगावरील जखमा, कातडीचे आजार, गर्भपात अशा विविध व्याधींनी येथील जनावरे हैराण झालेली आहेत. त्यांना उपचाराची मोठी गरज आहे. त्याचबरोबर औषधांचीही गरज आहे.'' 
 
अन्य तालुक्‍यांतूनही प्रतिसाद : डॉ. बडेकर 
दौंड तालुक्‍यातील खाजगी पशुवैद्यकांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात दहा पशुवैद्यक आहेत. आणि प्रत्येक पथक पूरग्रस्त भागात किमान तीन दिवस जनावरांवर उपचार करतील, असे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध विकास सेवा संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. संतोष बडेकर यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT