Pune News Esakal
पुणे

Pune News: भर चौकात त्यांनी मारली मिठी, पुण्यातील 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओ वरुन आता पुणेकर चांगलेच संतापले आहेत

सकाळ डिजिटल टीम

पुणे हे सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर. मात्र आता याच पुण्याची ओळख बदलत चालली आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ.

पुण्यातील एका चौकात भर दिवसा एका जोडप्याने एकमेकांना मिठी मारली. या कृत्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या लोकांचे डोळे त्यांच्याकडे लागले आहे. इतकचं काय तर चौकात ट्रॅफिक जॅम झाला.

अखेर वाहतूक पोलिसांनी या जोडप्याला रस्त्यातून बाजूला केलं. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे कळलं नसलं तरी सुद्धा व्हायरल झालेल्या व्हिडिओ वरुन आता पुणेकर चांगलेच संतापले आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान मुंबईतही एक तरुण आणि दोन तरुणींचा बाईकवर स्टंट करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र स्टंट करणं तिघांना चांगलच महागात पडलं आहे. चौघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ वांद्रे- कुर्ला कॉम्पेक्स येथील आहे. व्हिडीओतील दृष्यांनुसार एक तरुण बाईक चालवताना दिसत आहे. तर एक तरुणी त्यांच्या मागे तर एक मुलगी त्यांच्या पुढे बसली आहे. ट्रिपल सीट बसून यांनी वाहतूक नियमांची अक्षरश: ऐसीतैसी केल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

SCROLL FOR NEXT