teres 
पुणे

अरे बापरे ! चक्क त्यांनी यासाठी टेरेस घेतलेत भाड्याने 

दिलीप कुऱ्हाडे

पुणे : शहरातील मध्यवस्तीत लहान मोठ्या अनेक इमारती आहेत. या इमारतींवरील टेरेस चक्क भाड्याने दिले आहेत. अशा इमारतींवरील टेरेसवर तब्बल साडेपाचशे विक्रेत्यांनी आश्रय घेतल्याचे उघड झाले आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावरील व पेठांमधील हे सर्व विक्रेते आहेत. त्यांची उपासमार होत असल्यामुळे नुकतेच पुणे जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाकडून त्यांना शिधा वाटप करण्यात आले. 

सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणी इमारतींच्या टेरेसवर जमणाऱ्यांवर ड्रोन कॅमेऱ्यांव्दारे लक्ष ठेवले जात आहे. त्याचवेळी मात्र पुणे शहरातील मध्यवस्तीमधील लहान मोठ्या अशा अनेक इमारतींवरील टेरेसच विक्रेते भाड्याने घेऊन राहत आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

सकाळपासून ते रात्री नऊपर्यंत रस्त्यावर त्यानंतर स्वयंपाक आणि झोपण्यासाठी टेरेस भाड्याने घेऊन राहत असल्याचे उघड झाले आहे. आता लॉकडाउनमध्ये संबंधितांची उपासमार होत आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. 

शिवाजीरोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोडसह मध्यवस्तीतील पेठांमध्ये खेळण्यांपासून ते गृहोपयोगी वस्तूंची विक्री करणारे परराज्यातील साडेपाचशे विक्रेते आहेत. या सर्व विक्रेत्यांना शहरात घर भाड्याने घेणे परवडत नाही. त्यामुळे इमारतीवरील टेरेसच भाड्याने घेऊन राहणे पसंत केले आहे. या सर्व असंघटित विक्रेत्यांचे हातावर पोट असल्यामुळे गेले महिनाभर लॉकडाउनमुळे त्यांची उपासमार होत होती. त्यामुळे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाने त्यांना किराणा सामानाचे वाटप केले. 

चेतना महिला विकास संस्था आणि फरासखाना पोलिस ठाणे यांच्या मदतीने देहविक्री करणाऱ्या महिला व संबंधित विक्रेत्यांना शिधा वाटप करण्यात आले आहे. 

- अश्विनी कांबळे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, पुणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT