Thief arrested in by grandchildrens at untavadi pune
Thief arrested in by grandchildrens at untavadi pune 
पुणे

आजीच्या सौभाग्य अलंकारासाठी नातवांनी चोर केले जेरबंद

विजय मोरे

उंडवडी : कऱ्हावागज (ता. बारामती) येथील खोमणेवस्तीवर आज भरदुपारी आपल्या आजीच्या गळ्यातील मंगळसूत्र धूमस्टाईलने चोरून सुसाट निघालेल्या चोरास दोन नातवांनी सीआयडी स्टाईल पाठलाग करून जेरबंद केले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या चोराचे दोन साथीदार तेथूनही पळून गेल्यानंतर मग जळगाव सुपे येथील ग्रामस्थांनी मोर्चा सांभाळला आणि ग्रामस्थांनी व पोलिसांनी उर्वरित दोन जणांनाही जेरबंद केले. त्यानंतर भरदिवसा घडलेल्या या घटनेची आज दिवसभर तालुक्यात चर्चा होती.

या घटनेत पोलिसांनी सोमनाथ जोतिराम खुरंगे (रा. लाखेवाडी ता. इंदापूर जि पुणे), बालाजी भिकाजी गलांडे (रा. मोरवड ता. कळमनुरी जि. हिंगोली), खंडू रमेश काळे (रा. चापडगाव, ता. कर्जत जि. अहमदनगर) या तिघांना अटक केली. यापैकी खंडू काळे यास सचिन भागवत खोमणे व त्याचा भाऊ गणेश या दोघांनी पाठलाग करून एमएच 42 जीपी 8225 या पल्सर दुचाकीसह ताब्यात घेतले होते. त्यानंतर उर्वरित दोघांना जळगाव सुपेच्या ग्रामस्थ व पोलिसांनी ताब्यात घेतले. 

या घटनेची थोडक्यात हकीकत अशी, कऱ्हावागज येथे राहत्या घराच्या समोर बसलेल्या वालूबाई नारायण मदने या ज्येष्ठ महिलेस हाताने मारहाण करून तिच्या गळ्यातील 28 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पल्सरवरून वेगाने निघाले. त्याचवेळी वालूबाई ओरडल्याने त्यांचे नातू सचिन व गणेश खोमणे हे धावत घराबाहेर आले. त्यांच्या लक्षात घटना येताच त्यांनी दुचाकीवरून चोरटे निघालेल्या पल्सरचा पाठलाग केला. काही अंतरावर पाठलाग करून सचिन व गणेश यांनी पल्सर गाडी गाठली. त्याबरोबर सोमनाथ खुरंगे व बालाजी गलांडे हे दोघे दुचाकीवरून उड्या मारून झुडपांमध्ये पसार झाले. तर खंडू काळे यास दोघांनी दुचाकीसह पकडले. मग पोलिसांना कळविण्यात आले. तोपर्यंत जळगाव सुपे येथील बारामती दूध संघाचे माजी अध्यक्ष अनिल जगताप व त्यांचे सहकारी ग्रामस्थ मदतीला आले. त्यांनी लगेच धावाधाव करीत उर्वरित दोन साथीदारांपैकी एकास कऱ्हा नदीच्या पात्रात तर दुसऱ्यास भिलारवाडी गावच्या हद्दीत पाठलाग करून पकडले. 

दरम्यान वरील तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT