Arrested thief who used to theft two wheeler for fun in pune
Arrested thief who used to theft two wheeler for fun in pune 
पुणे

फक्त मौज-मजेसाठी 'त्यांनी' चोरल्या 25 दुचाकी

सकाळवृत्तसेवा

हडपसर : मौज-मजेकरीता दुचाकी चोरणाऱ्या चार आरोपींना हडपसर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 25 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी संजय हरिष भोसले उर्फ सोन्या  (वय 20, रा. शेवाळवाडी), ऋषीकेश बाबासाहेब डोंगरे उर्फ बिट्टु (वय 19, रा. शेवाळवाडी ), अभिषेक अनिल भंडगे उर्फ मोनु (वय 19, रा. शेवाळवाडी), अजित कैलास कांबळे उर्फ विठ्ठल (वय 21, रा. सर्व रा. शेवाळवाडी ) यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून मोठया प्रमाणात वाहन चोरी केली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पुणे : पिरंगुटमध्ये दुकानांना भीषण आग; जीवितहानी नाही

मगरपट्टा चौक येथे संशयीतरित्या वाहने पार्कींगमध्ये चार जण पाहाणी करत आहेत, अशी गोपनीय माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक संजय चव्हाण प्रताप गायकवाड, नितीन मुंढे, विनोद शिवले, अकबर शेख, शाहीद शेख यांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते व हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. चौघांची चौकशी केली असता त्यांनी वेगवेगळ्या कंपनीच्या किंमत रूपये 12, 20,000 च्या एकूण 25 मोटार सायकली मिळून आल्या. आरोपी हे शक्यतो हिरो होंन्डा कंपनीच्या मोटार सायकली चोरत होते. चोरलेल्या दुचाकी ग्रामीण भागात विकणार होत, अशी माहिती आरोपींकडून मिळाली.

अरे बापरे! मानाच्या विड्यासाठी मोजले तब्बल ३० लाख! कोठे ते पहा?

आरोपींकडून हडपसर पोलिस ठाणे 11 गुन्हे, वानवडी, कोंढवा, सहकारनगर, मार्केट यार्ड, येरवडा, लोणीकंद पोलिस ठाणे, लोणीकाळभोर पोलिस ठाणे, यवत पोलिस ठाणे, शिवाजी पोलिस ठाणे या आरोपींनी मोटार सायकल चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

बांगलादेशींना पकडायला गेले अन् 'मनसे'वाले स्वत:च अडकले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT