Chor 
पुणे

चोरीचा डाव आखला, पण सायरन वाजला

डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे) : घोडेगाव रस्त्यावर असलेल्या "गाडे पाटील ज्वेलर्स' या दुकानात पाच चोरटे चोरी करण्यासाठी आले होते; पण सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेला सायरन वाजल्यामुळे त्यांचा चोरीचा डाव फसला. सदर चोरीची घटना मंगळवारी (ता. 7) पहाटे घडली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोडेगाव रस्त्यावर खंडू गाडे यांचे "गाडे पाटील ज्वेलर्स' दुकान आहे. सोमवारी (ता. 6) रात्री गाडे दुकान बंद करून घरी गेले. मंगळवारी पहाटे ज्वेलर्सच्या दुकानासमोर मोटारीतून पाच चोरटे आले. मोटार रस्त्यावर थांबवून एक जण बसून राहिला. चार चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न करत होते. त्या वेळी सायरन वाजल्याने तेथून चोरट्यांनी पळ काढला. सायरनच्या आवाजाने मंचर पोलिस घटनास्थळी आले. त्या वेळी पोलिसांनी सदर माहिती गाडे यांना मोबाईलद्वारे दिली. गाडे यांनी ताबडतोब घटनास्थळी येऊन दुकान उघडून पाहणी केली; पण सुदैवाने काहीही चोरीला गेले नसल्याने त्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

दरम्यान, मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी मंचर शहरात नाकेबंदी करून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण चोरटे सापडले नाहीत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पाच चोरटे मोटारीसह कैद झाले आहेत. अंदाजे 25 ते 30 वयाचे चोरटे होते. त्यांनी तोंडाला रूमाल बांधलेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: सुनील गावस्करांचा KKR कर्णधार अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाले, बघ, मी सांगतोय त्याचा विचार कर, नाहीतर

प्रेक्षकांच्या लाडक्या पंचायतला 6 वर्षं पूर्ण ! लवकरच रिलीज होणार पाचवा सीझन, प्राईम व्हिडिओची घोषणा

Pune Highway Accident News: सोरतापवाडीत मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरखाली तरुणाचा मृत्यू; हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, अटक

Karad Farmer Death: कऱ्हाडच्या भोळेवाडीत शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू; मुसळधार पावसाने तांबवे विभागात भीतीचे वातावरण

Thane News: नव्या ‘लालपरी’ची प्रतीक्षा, ७० नव्या बसची घोषणा कागदावरच; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT