Thief valuables worth Rs 4.25 lakh attack 80 year old woman caretaker Pashan Pune
Thief valuables worth Rs 4.25 lakh attack 80 year old woman caretaker Pashan Pune 
पुणे

पाषाणमध्ये घरफोडी ; 80 वर्षाच्या वृद्धेचे हात बांधून सव्वाचार लाखांची चोरी

सकाळवृत्तसेवा

पुणे : पाषाण येथील एका घरातून चोरट्यांनी सव्वाचार लाखांचा ऐवज लुटून नेला. घरातील ८० वर्षीय महिला व केअर टेकरचे हात व तोंड बांधून त्यांना चोरट्यांनी काठी व कोयत्याने मारहाण केली. ही घटना बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ८० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा पाषाणमध्ये पंचवटी नावाचा बंगला आहे. त्यांचे पती निवृत्त वकील आहेत. ते अर्धांगवायूने ग्रस्त असून, बेडवर झोपून असतात. फिर्यादीचा मुलगा अमेरिकेत असतो. तर दोन विवाहित मुली पुण्यातच राहतात. आजारी पतीची काळजी घेण्यासाठी त्यांनी एक केअर टेकरची नियुक्ती केली होती.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी, त्यांचे पती व केअर टेकर असे तिघे घरामध्ये होते. त्यावेळी चार चोरटे कोयता, सुरा व काठी घेऊन घरात घुसले. त्यांनी फिर्यादीच्या पतीची काळजी घेणाऱ्या केअर टेकरच्या पायावर काठीने व कोयत्याने मारुन त्यांना जखमी केले. यानंतर केअर टेकर व फिर्यादी यांचे हात व तोंड कापडाने बांधून घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पसरवून किमती ऐवज शोधण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एकाने ‘माल कोठे आहे’ अशी विचारणा करीत दोघांना मारहाण केली. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील बेडरूमच्या कपाटात ठेवलेली २५ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने असा चार लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष कोळी करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT