Thieves broke into the home of a retired police officer 
पुणे

शिरुरमध्ये चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचं घर फोडलं

सकाळवृत्तसेवा

टाकळी हाजी(पुणे) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात वाहनांच्या चोरी नंतर घरफोड्यांच्या घटना वाढू लागल्या आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष घालून गावागावात गस्त सुरू करण्यात याव्यात. तसेच या घटनांचा छडा लावण्याची मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत. पिंपरखेड ( ता. शिरूर ) येथील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी दयानंद ढोमे यांचा बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, साहित्य व रोकड अशा एक लाख रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. या बाबत वैशाली दयानंद ढोमे यांनी टाकळी हाजी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

पिंपरखेड - काठापूर खुर्द रस्त्याच्या बाजूला सेवानिवृत्त पोलिस अधिकारी दयानंद ढोमे यांचे घर आहे. सध्या हे घर बंद असून ते पुण येथे राहतात. मंगळवार ( ता. 9 ) रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश मिळवला. सोन्याचे दागिने, साहित्य व रोख रक्कम सह 1 लाख 32 हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. बुधवार ( ता. 10 ) सकाळी चोरी झाल्याचे निर्दशनास आले आहे. या बाबत सेवानिवृत्त पोलिस अधिकारी जी. पी. दाभाडे, पोलिस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे यांनी पोलिसांना माहिती दिली. शिरूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरूदेव काबूगुडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा


कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथे शुक्रवार ( ता. 12 ) रात्री च्या सुमारास तीन दुकानांचे शटर तोडून किरकोळ साहित्य लंपास केले आहे. राजलक्ष्मी अॅग्रो, बाबाजी फोकळे व बाळासाहेब कदम यांच्या दुकानाचे शटर तोडल्याचे सकाळी निदर्शनास आले. किरकोळ साहित्यांची चोरी झाल्याची चर्चा आहे. याबाबत कोणतीच तक्रार पोलिस चौकीत करण्यात आलेली नाही. परीसरात 25 गाव 25 वाड्या असल्याने व पोलिस कर्माचाऱ्यांची कमतरता असल्याने सगळीकडे रात्रीची गस्त शक्य नाही. नागरिकांनी परीसरात सिसीटिव्ही बसविले तर या चोरट्यांचा बंदोबस्त करणे सोपे जाईल. यासाठी नागरीकांनी पुढाकार घ्यावा. असे आवाहन काबूगुडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT