चोरी sakal
पुणे

चोरट्यांनी "एसआरए'च्या साडे चारशे सदनिकांमधील सव्वा लाखाचे नळ पळविले

साडे चारशे सदनिकांमधील सव्वा लाख रुपयांचे नळ चोरट्यांनी चोरुन नेले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) हडपसर येथील शिंदे वस्तीत बांधलेल्या "एसआरए'च्या इमारतीमधी नळ चोरट्यांनी चोरुन नेले. साडे चारशे सदनिकांमधील सव्वा लाख रुपयांचे नळ चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी "एसआरए'चे तहसीलदार विकास भालेराव (47) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालेराव हे "एसआरए'च्या पुणे व पिंपरी विभागातील ताबा विभागाचे प्रमुख आहे. (Pune News)

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत हडपसरमधील शिंदे वस्तीत काही इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यापैकी "ए' आणि "बी' या इमारतीत एकुण 439 सदनिका आहेत. या इमारतीमध्ये काही नागरीकांना सदनिकांचा ताबा देण्यात आला आहे, तर काही सदनिकांचा अद्याप ताबा दिलेला नसल्याने त्या सदनिका कुलूप लावून बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. इमारतीच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांचीही नेमणूक केलेली आहे. चोरट्यांनी बंद सदनिकांच्या दरवाज्याचे कुलुप तोडून स्वयंपाकघर, प्रसाधनगृहातील नळ, शॉवर चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत एक लाख नऊ हजार 750 रुपये असल्याचे भालेराव यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सौरभ माने करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT