Pune Crime News  sakal
पुणे

Pune Crime News : पैसे देण्यास नकार दिल्यावरून हॉटेलचालकावर चालवली गोळी, पुण्यात तीन दिवसांत तिसरा गोळीबार

पैसे देण्यास नकार दिल्यावरून एका हॉटेलचालकावर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी (ता. १८) मध्यरात्री येरवडा परिसरात घडली. यामध्ये विकी राजू चंडालिया (वय ३०, रा. जय जवाननगर, येरवडा) जखमी झाला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पैसे देण्यास नकार दिल्यावरून एका हॉटेलचालकावर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी (ता. १८) मध्यरात्री येरवडा परिसरात घडली. यामध्ये विकी राजू चंडालिया (वय ३०, रा. जय जवाननगर, येरवडा) जखमी झाला. शहरात तीन दिवसांत गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. जंगली महाराज रस्त्यावरील अन्य एका घटनेत पिस्तुलातून गोळीबाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.

या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. आकाश सतीश चंडालिया, अक्षय सतीश चंडालिया, अमन सतीश चंडालिया, अभिषेक श्याम चंडालिया (सर्वजण रा. रेंजहिल्स, पुणे), सुशांत प्रकाश कांबळे (रा. पर्णकुटी सोसायटी, येरवडा), संदेश संतोष जाधव आणि संकेत तारू (दोघे रा. जय जवान नगर येरवडा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. तारू अद्याप फरार असून उर्वरित पाच जणांना अटक केली आहे. यावेळी झालेल्या हाणामारीत आकाश जखमी झाला. आरोपींविरुद्ध पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्रसेन हायस्कूलसमोरील व्ही. आर. ४ यू हॉटेलमध्ये गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास सराईत गुन्हेगार आले. त्यांनी हॉटेलचालक विकी याच्याकडे पैशांची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी विकीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आकाशने ‘आज तुझा गेमच करतो’ असे म्हणत पिस्तुलातून विकीच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गोळीबार करून आरोपी पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ निरीक्षक संतोष पाटील घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर फरार झालेल्यांपैकी पाच आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे (गुन्हे) करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC बाबत मोठी अपडेट! 11 हजार जागा वाढणार... वयोमर्यादेतही वाढ? व्ही. राधा समितीच्या अहवालात काय?

Vishal Patil Sugarcane Price Meeting : ऊसदराच्या बैठकीत खासदार विशाल पाटील भडकले; स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांशी खडाजंगी, सभागृहात गोंधळ

Diwali 2026: नरक चतुर्दशी अन् लक्ष्मीपूजन एकाच दिवशी! जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि अभ्यंगस्नानाची वेळ...

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात कडकडीत बंद; राजू शेट्टींचे आवाहन

IPL 2027 Trade News: हार्दिक पांड्या नेमका कोणत्या संघात जाणार? वाऱ्यावरच्या चर्चांनंतर BCCI ची मोठी घोषणा, लवकरच चित्र होईल स्पष्ट

SCROLL FOR NEXT