Corona Patient Sakal
पुणे

खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची तेरा कोटींची लूट

तपासणी पथकांच्यावतीने १९ मे ते २ जून या दोन आठवड्याच्या कालावधीतील १२ हजार १५२ देयकांची तपासणी करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहर, (Pune City) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील (Rural Area) कोरोना रुग्णांकडून (Corona Patient) खासगी रुग्णालयांनी (Private Hospital) मागील दोन फक्त दोन आठवड्यात १२ कोटी ८९ लाख ८ हजार ८० रुपयांची जास्तीची रक्कम देयकांपोटी वसूल (Recovery) केली आहे. देयकांच्या उलट तपासणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या तपासणी पथकांच्या तपासणीत ही बाब उघडकीस आली आहे. ज्या रुग्णांकडून देयकापोटी अधिकची रक्कम वसूल केली आहे, अशा रुग्णांना त्यांची जास्तीची रक्कम परत करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. (Thirteen Crore Robbery of Corona Patients from Private Hospitals)

तपासणी पथकांच्यावतीने १९ मे ते २ जून या दोन आठवड्याच्या कालावधीतील १२ हजार १५२ देयकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयांनी सर्वाधिक ६ कोटी ४१ लाख ६९ हजार ५३३ रुपयांचे तर, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णालयांनी सर्वात कमी म्हणजेच २ कोटी १३ लाख ५१ हजार ४४ रुपयांचे जास्तीचे देयक आकारणी केल्याचे निर्दशनास आले आहे.

रुग्णांकडून उपचाराच्या देयकापोटी घेण्यात आलेली जास्तीची रक्कम संबंधित रुग्णांना परत करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे. ही देयके परत करण्याबाबत प्रांताधिकारी आणि तहसीलदार पाठपुरावा करणार आहेत. शहर व जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारने उपचाराच्या रकमेबाबत काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. तसेच उपचारासाठीच्या देयकांच्या रकमेची निश्‍चिती कशी करावी, याचे दरपत्रक निश्‍चित करून दिलेले आहे. तरीसुद्धा काही खासगी रुग्णालये रुग्णांची मोठी आर्थिक लूट करत असल्याचे दिसून आले आहे.

कोरोना रुग्णांचे देयक (बिल) व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यातीने सुमारे ३५० पथकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक पथकात दोन अधिकारी नियुक्त केले आहेत. रुग्णालयनिहाय प्रत्येकी एक तपासणी पथक स्थापन केले आहे.

तपासलेली देयके आणि जास्तीची रक्कम (रुपयांत)

- क्षेत्र देयकांची संख्या जास्तीची आकारलेली रक्कम

- पुणे शहर १३३५ ४ कोटी ३३ लाख ८७ हजार ५०३

- पिंपरी चिंचवड ४४०४ ६ कोटी ४१ लाख ६९ हजार ५३३

- जिल्हा परिषद क्षेत्र ६४१४ २ कोटी १३ लाख ५१ हजार ४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT