Thorale Bajirao Memorial sakal
पुणे

Thorale Bajirao Memorial : पालखेडला थोरले बाजीरावांचे स्मारक उभारणार

थोरले बाजीराव पेशवे यांनी आपल्या अफाट युद्धनीतीच्या बळावर आपल्या सैन्याच्या रक्ताचा थेंबही न सांडता हैदराबादच्या निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव केला होता.

महिमा ठोंबरे

पुणे - थोरले बाजीराव पेशवे यांनी आपल्या अफाट युद्धनीतीच्या बळावर आपल्या सैन्याच्या रक्ताचा थेंबही न सांडता हैदराबादच्या निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव केला होता. या ऐतिहासिक लढाईच्या ठिकाणी आता थोरले बाजीराव पेशव्यांचे स्मारक उभे करण्यात आले आहे. पालखेड स्मारक समितीला यासंबंधी परवानगी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होईल.

पालखेड स्मारक समितीतर्फे या स्मारकासाठी गेल्या दीड वर्षांपासून प्रयत्न केले जात होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालखेड येथे थोरले बाजीराव पेशवे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याची कल्पना समितीने मांडली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुतळ्यासाठी आवश्यक असणारी परवानगी दिली आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार असून स्मारकाचा आराखडाही तयार झाला आहे.

पालखेड ग्रामपंचायतीने स्मारकासाठी जागा दिली असून पुण्यातील शनिवारवाड्यासमोर असलेल्या पेशव्यांच्या पुतळ्यासारखाच पुतळा येथे उभारण्यात येणार आहे. या स्मारक समितीत प्रशांत गोऱ्हे, जगन्नाथ लडकत, पुष्कर पेशवे, मोहन शेटे, रमेश भागवत, श्रीकांत नगरकर आदींचा समावेश आहे.

ऐतिहासिक विजय

पालखेडची लढाई १७२८ मध्ये झाली होती. या लढाईत मराठ्यांपेक्षा निजामाचे सैन्य संख्येने अधिक होते. मात्र थोरले बाजीराव पेशवे यांनी निजामाच्या सैन्याचे पाणी रोखले, संपूर्ण रसद तोडली आणि निजामाला चारही बाजूंनी कोंडीत पकडले. अखेर निजामाला शरण येण्यास भाग पडले आणि तहास मान्यता द्यावी लागली. मराठ्यांच्या इतिहासातील हा ऐतिहासिक विजय ठरला.

इतिहास समजून घेण्यास मदत

पालखेडच्या लढाईचा अभ्यास आजही जगभरातील युद्धशास्त्राच्या अभ्यासक्रमांमध्ये केला जातो. फील्ड मार्शल माँटगोमेरी यांनी जगात झालेल्या सर्वोत्कृष्ट लढायांवर लिहिलेल्या सुप्रसिद्ध ग्रंथात जगातील स पालखेडच्या लढाईचा अग्रभागी समावेश केला आहे. याच लढाईच्या ठिकाणी स्मारक तयार होत असल्यामुळे येणाऱ्या अनेक पिढ्यांना आपला गौरवशाली इतिहास समजून घेण्यास मदत होईल, असा विश्वास पालखेड स्मारक समितीच्या सदस्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Verdict: सेक्सनंतर जन्मकुंडलीचा बहाणा करून लग्न नाकारणे हा गुन्हा; दिल्ली उच्च न्यायालयाचा स्पष्ट निकाल

IPO Market: रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील दिग्गज कंपनीचा ₹31,000 कोटींचा IPO बाजारात! गुंतवणूक करण्याआधी वाचा डिटेल्स

Video : राजवाडेंमुळे आनंद उचलणार टोकाचं पाऊल ? प्रोमो पाहून प्रेक्षक अस्वस्थ "हा समर डोक्यावर पडलाय"

RTE Reimbursement: आरटीई अनुदान रखडल्याने शाळांची कोंडी; पाच वर्षांपासून ९५ कोटी थकीत, न्यायालयीन आदेशाची पायमल्ली?

'आतल्या आत घुसमटत...' नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबद्दल पहिल्यांच बोलली समांथा, म्हणाली...'माझा डिव्होर्स झाला, तेव्हा…'

SCROLL FOR NEXT