threat to political leaders police arrest accused pune mla mahesh landge avinash bagave sakal
पुणे

Crime News : राजकीय नेत्यांना धमकी देणारा अखेर जेरबंद

बंडगार्डन आणि समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भोसरी येथील भाजपचे आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डरला खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अखेर पोलिसांनी जेरबंद केले. मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीसोबतही त्याचे संबंध असल्याचे समोर आले आहे.

शाहनवाझ रौफ गाजी खान (वय ३१, रा. गुरुवार पेठ, सध्या कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन आणि समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शहरातील राजकीय नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना व्हॉटसअप कॉल करून खंडणीसाठी धमकी देण्याचे प्रकार वाढले होते. याप्रकरणी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके तयार करण्यात आली होती.

खंडणी विरोधी पथक-२ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार लांडगे यांना अज्ञात मोबाईल क्रमांकावरून ‘३० लाखांची खंडणी न दिल्यास जिवाला धोका आहे, असा धमकीचा मेसेज आला होता. काँग्रेसचे माजी नगरसेवक बागवे यांच्याकडेही खंडणीची मागणी करून गोळ्या घालून ठार मारू, अशी धमकी व्हाट्सअप कॉलवरून दिली होती. तसेच, पुण्यातील एका बिल्डरला खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, मनसेचे नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अब्दुल खालिद अब्दुल रौफ सय्यद (वय ३२, रा. भिवंडी, मूळ उत्तरप्रदेश) याला यापूर्वी अटक केली होती. तर, दुसरा आरोपी इम्रान शेख हा अन्य एका गुन्ह्यात कारागृहात आहे. शाहनवाझ खान आणि इम्रान शेख हे दोघे मित्र आहेत. खराडी येथील एका तरुणीला त्रास देण्याच्या उद्देशाने तो हे करीत होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे, असे पोलिस निरीक्षक मानकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Municipal Election : बंडखोरी करणारे भाजपचे ३२ जण निलंबित; अग्रवाल, भगवान मेंढे, दीपक चौधरीचा समावेश

Nagpur Crime : प्रेमसंबंधातून बहीण-भावावर हल्ला; दोघेही गंभीर जखमी, आरोपी अटक

दुर्दैवी घटना! गोरेगावमधील भगतसिंग नगरमध्ये भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू

Budget 2026 : करदात्यांसाठी खुशखबर! येणाऱ्या बजेटमध्ये ‘या’ ५ गोष्टींमध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; तुम्हाला नेमका काय फायदा?

World GK : भविष्य सांगणारा आरसा ते मेलेल्या लोकांशी बोलण्यापर्यंत..! 'या' 7 गॅझेट्सनी जगाला हादरवलंय

SCROLL FOR NEXT