Three arrested from Pune for betting on IPL 2023 cricket matches  IPL Cricket
पुणे

IPL 2023 : सट्टेबाजीचं दुबई कनेक्शन! पुण्यात पब मालकासह तिघांना अटक

रोहित कणसे

पुणे : आयपीएल (IPL 2023) होणाऱ्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या तिघांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका प्रसिध्द पबचा मालक हितेश मेहता आणि एका बड्या बुकीचा देखील समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. पुणे क्राइम ब्रँचेने या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

सट्टेबाजीचं दुबई कनेक्शन

मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, आरोपींमध्ये शहरातील एका पबच्या मालकासह बड्या सट्टेबाजाचा समावेश आहे.

या आयपीएल सामन्यांवरील सट्टेबाजीचे धागेदोरे दुबई, नागपूर, मुंबई या शहरात असल्याचे उघडकीस आले आहे. पुण्यातील कोंढव्यातील एका इमारतीत शनिवारी पोलिसांनी कारवाई केली होती.

याप्रकरणी जितेश मेहता आणि अक्षय तिवारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. जितेश मेहता हा पुण्यातील प्रसिद्ध पबचा मालक आहे. इंदूरमधील सट्टेबाज अक्षय तिवारी याच्याशी मेहताचे संबंध होते. यात आणखी किती जण या सट्टेबाजीत गुंतल आहेत याचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Wari: पुणे–पंढरपूर महामार्गावरील वाहतुकीत बदल; १० ते १५ जुलैदरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

दीड वर्षीय चिमुकल्याला ३० सेकंदात ८ वेळा आपटलं, आरोपीला फाशीची शिक्षा; ४० दिवसात निकाल, काय घडलं होतं?

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रात्री १० वाजता पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखींचे घेणार दर्शन

Sant Nilobaray Maharaj Palkhi : निळोबाराय महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान

Devendra Fadnavis: 'राजकारणात नाही, मिमिक्रीत असते तर...'; देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना सुनावलं; राजकीय वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT