Crime Sakal
पुणे

मंचर : राण्या बाणखेले खूनप्रकरणात तिघांना अटक; दोघांचा शोध सुरू

सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ राण्या बाणखेले (रा. मंचर) याला गोळ्या घालून हत्या केल्याच्या गुन्ह्यात एकूण नऊ जणांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले.

सकाळ वृत्तसेवा

मंचर - मंचरजवळ फकीरवाडी-एकलहरे (ता. आंबेगाव) येथे सराईत गुन्हेगार (Criminal) ओंकार उर्फ राण्या बाणखेले (रा. मंचर) याला गोळ्या घालून हत्या (Murder) केल्याच्या गुन्ह्यात एकूण नऊ जणांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. बुधवारी (ता.४) सौरभ कैलास पोखरकर (वय १९), लुट्या उर्फ तुषार नितीन मोरडे (वय २३, दोघे रा.मंचर), आकाश संतोष खैरे (वय २०, रा. वारुळवाडी, ता.जुन्नर) या तिघांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या एकूण आरोपींची संख्या सात असून त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. (Three Arrested in Ranya Bankhele Murder Case Search Two Continues)

राण्या बाणखेले याची हत्या रविवारी (ता.१) करण्यात आली होती. या घटनेची गांभीर्याने दाखल घेऊन आरोपी जेरबंद करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लांभाते यांनी मंचर पोलिस ठाण्यात भेट दिली. गुन्हेगारांना अटक करण्याकामी गुन्हे अन्वेषण शाखेसह तीन पोलिस पथकांना समांतर पद्धतीने तपास करण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनीही बुधवारी (ता.४) मंचर पोलिस ठाणे व घटनास्थळाला भेट देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यापार्श्वभुमीवर आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, सौरभ पोखरकर, लुट्या ऊर्फ तुषार मोरडे, आकाश खैरे या आरोपींना घोडेगाव न्यायालयाने शनिवार (ता.७) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिस पथक करत आहे, अशी माहिती निरीक्षक बलवंत मांडगे यांनी दिली.

पिस्तूल व प्रशिक्षणाबाबत तपास

गुन्हेगारांनी वापरलेले दोन पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहेत. पिस्तूल कोणी दिले, गुन्हेगारांना पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षण देणारे कोण, तसेच कटाच्या सूत्रधारांचा छडा लावण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT