डॉक्टर sakal
पुणे

पुणे : तीन बोगस डॉक्टरांना विमाननगर येथे अटक

महापालिका आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वैद्यकीय प्रमाणपत्र नसतानाही विमाननगर येथे दवाखाना टाकून तेथे नागरिकांच्या जिवाशी खेळून केशरोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या तीन बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली. पुणे पोलिसांची गुन्हे शाखा, महापालिका आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई केली. शाहरुख हैदर शहा, पंचशीला काशिनाथ रोडगे व चैताली भरत म्हस्के (सर्व रा. वडगाव शेरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

विमाननगर परिसरात लुंकड क्लाइमैक्स या इमारतीमध्ये प्रमाणपत्र नसताना ‘डॉ. हेअर मैजिका’ नावाचा दवाखाना चालविण्यात येत असून त्या ठिकाणी केशरोपण शस्त्रक्रिया केली जात असल्याची माहिती पोलिस नागेशसिंग कुंवर यांना मिळाली होती. त्यानुसार महापालिका बोगस डॉक्टर कारवाई समिती आणि अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय विभागीय अधिकारी डॉ. रेखा गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे पथक आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी नागरिकांवर केशरोपन शस्त्रक्रिया केली जात असल्याचे उघड झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

IND vs AFG: वैभव संजू ईशान श्रेयस सगळे तयार, मग तिलक वर्माचं काय? AB डिव्हिलियर्सने टीम इंडियासमोर उभा केला मोठा पेच, ‘तो कुठे खेळणार?

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

SCROLL FOR NEXT